आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषधाचा काळाबाजार:5 हजार रुपयांचे रेमेडिसिव्हिर इंजेक्शन 20 हजार रुपयांना विकायचे, मुंबईत दोन केमिस्ट्सना अटक

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • दोघांनाही मुंबई लगतच्या मीरानगरमधून पकडण्यात आले

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये प्रभावी मानल्या जाणार्‍या रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू आहे. याप्रकरणी बीएमसीने मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या दोघांवर एमआरपीपेक्षा अधिक पटीने म्हणजे 5400 रुपयांचे एक इंजेक्शन 20 हजार रुपयांत विकत होते असा आरोप आहे. दोघांनाही मुंबईतील मीरानगर येथून पकडण्यात आले. दोघेही केमिस्ट आहेत आणि एक इंजेक्शनची 20 हजार रुपयांत विक्री करत होते. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी सोनू दर्शन (25) आणि रॉड्रिग्ज रावल (31) यांना साईबाबा नगर येथून अटक केली आहे.

असे पकडले आरोपी

पोलिसांनी बनावट ग्राहक बनवून रेमेडिसिव्हिरचे इंजेक्शन घेण्यासाठी सोनूच्या केमिस्टच्या दुकानात एकाला पाठवले आणि त्याने चार इंजेक्शन विकत घेतले. सोनूने एक इंजेक्शनची 20 हजार रुपये किंमत सांगितली आणि पैसे देताना टीमने छापा मारून 4 बाटल्यांसोबत त्याला पकडले. रॉड्रिग्ज रावलला देखील अशाप्रकारे पकडले. 

मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये आवश्यक वस्तू कायदा आणि एफडीए कायद्याच्या संबंधित तरतुदींसह आयपीसीच्या कलम 420 (फसवणूक) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बीएमसीने दिले कठोर कारवाईचे निर्देश

कोरोना व्हायरसचे वाढती प्रकरणे पाहता रेमेडिसिव्हिरची मागणी वाढत आहे. त्यानंतर अनेक खासगी रुग्णालयांनी रेमेडिसिव्हिरची कमतरता असल्याची तक्रार करत आहेत. बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह यांनी सांगितले की, गरजू रूग्णांना हे औषध मोफत देण्यात येणार आहे, तर मुंबई महानगर प्रदेशातील जसे की, ठाणे सारख्या रुग्णालयांना ते खरेदी करावे लागेल. असे न करणाऱ्यांना आणि औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे चहल यांनी म्हटले आहे.

काय आहे रेमेडिसिव्हिर औषध?

अमेरिकन औषध निर्माता कंपनी गिलियड सायन्सेसने इबोलावर उपचार करण्यासाठी अँटी-व्हायरल औषध रेमेडिसिव्हिर तयार केले. मात्र इबोलाच्या उपचारात ते कुचकामी ठरले. अमेरिकेत या औषधाची तपासणी कोरोना रूग्णांवर केली होती. येथील व्हायरोलॉजिस्ट डॉ अँथनी फौसी यांनी सांगितले होते की, रेमेडिसिव्हिरमुळे मृत्यू दर कमी केला जाऊ शकतो. हे औषध उपयुक्त आहे. यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने कोरोना रुग्णांसाठी आपत्कालीन स्थितीत या औषधाचा उपयोग करण्याची मंजुरी दिली होती. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser