आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत लसीकरणानंतर पहिला मृत्यू:65 वर्षीय व्यक्तीचा व्हॅक्सीन घेतल्याच्या दिड तासानंतर मृत्यू; व्यक्तीला अनेक आजार असल्याची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, लसीकरण समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे

सोमवारी मुंबईत व्हॅक्सीन घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. शहरातील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोना व्हॅक्सीन घेतल्याच्या दिड तासानंर मृत्यू झाला. मृत व्यक्ती सोमवारी लसीचा पहिला डोस घेण्यासाठी जोगेश्वरीमधील मिलट नर्सिंग होममध्ये गेला होता. लस घेतल्यानंतर तो लगेच चक्कर येऊन कोसळला. यानंतर त्याला अतिदक्षता विभागात(ICU) भरती करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नगर पालिका अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, तज्ज्ञ समितीकडून या प्रकरणाचा तपास केला जाईल. तुर्तास याला थेट लसीकरणाशो जोडणे योग्य नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीला दुपारी 3.37 वाजता सीरम इंस्टिट्यूटच्या कोवीशील्ड व्हॅक्सीनचा 0.5ml डोस दिला होता. व्हॅक्सीन लावताच तो चक्कर येऊन पडला.

BMC ने सांगितले की, ''सुरुवाती तपासात समोर आले आहे की, त्या व्यक्तीला कार्डियोमायोपॅथी (ह्रदयाचे ठोके कमी होणे), ventricular dysfunction, हायपरटेंशन आणि डायबिटीजसारखे गंभीर आजार होते."

लसीकरण समितीने सुरू केला प्रकरणाचा तपास

BMC चे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांनी सांगितले की, लसीकरण समिती(AEFI)या घटनेचा तपास करेल. तो व्यक्ती लस घेतल्यानंतर कोसळताच त्याला अॅड्रेनालाईन इंजेक्शन दिले होते. हे इंजेक्शन काही केसेसमध्ये लसीकरणानंतर होणाऱ्या तीव्र इफेक्ट्सला कमी करण्यासाठी दिले जाते.

भिवंडीत दुसरा डोस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू

मुंबईमध्ये 4 लाख लोकांना लस देण्यात आली असून, 400 पेक्षा जास्त लोकांमध्ये याचे साइड इफेक्ट पाहण्यात आले आहेत. या सर्वांवर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतात लसीकरणानंतर 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, केंद्रानुसार मृत्यूमागे फक्त व्हॅक्सीनच एकमेव कारण नाही. मागच्या आठवड्यात, मुंबईतील भिवंडी परिसरात एका 40 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...