आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात पुणे आणि मुंबईतील कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून 100 कोटींची भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यावर आता सोमय्या यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कोव्हिड केंद्रांचे कंत्राट मिळालेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीने किरीट सोमय्या यांनी एक नोटीस पाठवली आहे. या नोटीमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि पुण्यातील कोरोना सेंटरमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या वारंवार करत आहेत. कोव्हिड केंद्रांचे कंत्राट मिळालेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी आक्रमक झाली असून, कंपनीने सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला असून, नोटीस प्राप्त झाल्यानंतर 24 तासात कंपनीची लेखी माफी मागावी अन्यथा कारवाई केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे. आमच्या कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट हे कायदेशीर प्रक्रियेने मिळाले होते. त्यामुळे कुठल्याही यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी झाली तरीही आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने स्पष्ट केले आहे.
तर तिकडे किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. कोरोना काळात कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. कोव्हिड सेंटरचे कंत्राट कोणताही अनुभव नसलेल्या आणि बनावट कंपनीला देण्यात आले. त्यामुळे कोव्हिड सेंटरमध्ये अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यापैकी 30 ते 35 कोटी रुपये दिल्याचे पुरावे माझ्याकडे असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, हे सर्व प्रकरण सुरू असताना लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीने किरीट सोमय्या यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला असून, सोमय्या यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाई केली जाईल. असे म्हटले गेले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या माफी मागणार का? हे पाहावे लागणार आहे.
आज दुपारी चार वाजता राऊतांची पत्रकार परिषद
शिवसेनेसह आघाडी सरकारमधील मंत्र्यांमागे ईडीसोबतच विविध केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा मागे लागल्याने शिवसेनेने आता भाजपविरोधात शड्डू ठोकला असून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी दादरच्या शिवसेना भवनात विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत. ‘आम्ही खूप सहन केलं, बरबाद पण आम्हीच करणार आहोत. आता बघाच,’ अशा शब्दांत राऊतांनी भाजपला इशारा दिला. आश्चर्य म्हणजे या पत्रकार परिषदेला पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित असणार आहेत. यामुळे शिवसेना काेणता बाॅम्ब फोडणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे.
पक्षात एकाकी पडल्याने पत्रकार परिषदेचा घाट
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील ठेकेदारांची ईडी चौकशी करत आहे. स्वत: राऊत केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर असल्याने पक्षात एकाकी पडले आहेत.
पत्रकार परिषदेपूर्वी प्रश्नांची उत्तरे द्या : भाजप
उद्या पत्रकार परिषद घेणार आहात, तर आजच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट घातला जातोय,” असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.