आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रेमडेसिवीरचा काळा बाजार:कोरोनावर उपचारासाठीचे 5 हजारांचे इंजेक्शन चक्क 30 हजार रुपयांत विकताना 7 जणांना अटक, औषधांच्या काळ्या बाजाराविरुद्ध एफडीएने जारी केले हेल्पलाइन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांच्या पत्राशिवाय चढ्या भावाने विकायचे कोरोनावरील इंजेक्शन, सापळा रचून असे पकडले
  • आपल्या भागात अशा घटनेची तक्रार करण्यासाठी डायल करा 1800 222 365 किंवा 022- 26592362

अन्न आणि औषध प्रशाशन आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त टीमने कोरोना व्हायरसवरील औषधांच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या माहितीनुसार, हे लोक कोरोनावर उपचारासाठी वापरल्या जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन सहा पट भावात विकत होते. बाजारात 5,400 रुपयांत विकणाऱ्या या इंजेक्शनची केवळ फोनवरून 30 हजार रुपयांत विक्री केली जात होती.

सापळा रचून केली अटक

या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि ओळख पत्र न विचारता इंजेक्शन विकत होते. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) चे सह आयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांना या प्रकरणाची तक्रार मिळाली. यानंतर एफडीएने पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. आरोपीच्या मोबाईलवर संपर्क साधून रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करण्यात आली. समोरून आरोपींनी 30 हजार रुपयांत इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पोलिसांनी डमी ग्राहक बनून मुलुंड येथून रंगेहात अटक केली.

पकडण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव विकास दुबे आहे. त्याच्याच माहितीवरून राहुल गढा नावाच्या व्यक्तीला पकडण्यात आले. आणखी तपास करून पोलिसांनी आणखी 6 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले. काळ्या बाजाराचा भांडाफोड करताना पोलिसांनी इतर 5 आरोपी भावेश शहा, आशीष कनोजिया, रितेश ठोंबरे, गुरविंदर सिंग आणि सुधीर पुजारी यांना अटक केली. या सर्वांची कसून चौकशी केली असता आणखी 13 इंजेक्शन जप्त करण्यात आले. पकडण्यात आलेले सर्वच आरोपी मेडिकल स्टोअर आणि मेडिकल एजंसीवर काम करत होते.

एफडीएकडून टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी

सर्वच आरोपींच्या विरोधात मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व करणारे भारद्वाज यांनी लोकांना आपल्या परिसरात होणाऱ्या औषधींच्या काळा बाजार विरोधात जागरुक राहण्याचे अपील केले आहे. कुणीही आपल्याकडून औषधींससाठी जादा पैसे घेत असतील तर त्यांची तक्रार एफडीएचे टोल फ्री क्रमांक 1800 222 365 अथवा 022- 26592362 वर करता येईल.