आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:मीरा रोडच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर दोनवेळा बलात्कार, माहिती मिळताच पतीने दिला घटस्फोट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील मीरा रोडवर असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये एका महिला रुग्णावर दोनवेळा बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी क्वारंटाइन सेंटरच्या गार्डला ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी दाखल झालेल्या एफआयआरनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित घटनेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कडक कारवाईची मागणी केली होती. यावर गृहमंत्री ट्वीटवर म्हणाले की,"ठाणे पोलिसांनी याप्रकरणात तात्काळ लक्ष घालावे. नीलमजी याप्रकरणी पोलिस कडक कारवाई करतील. महिलांविरोधात होणारी कोणतीही घटना खपवून घेतली जाणार नाही."

जूनमध्ये घडली घटना, आता झाली एफआयआर

नवघर पोलिस स्टेशनचे इंस्पेक्टर संपत पाटिल म्हणाले की, मीरा रोडच्या कोविड केअर सेंटरमध्ये एका 20 वर्षीय महिलेवर बलात्कार झाला होता. याप्रकरणी 27 वर्षीय सुरक्षा गार्डला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने सांगितल्याप्रमाणे घटना जून महिन्यातील आहे. बदनामी होण्याच्या भातीने महिलेने इतक्या दिवस कोणालाही काही सांगितले नाही. पण, शनिवारी हिम्मत करुन महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन आरोपीला अटक केली.

बलात्काराची माहिती मिळताच पतीने दिला घटस्फोट

पीडितेने आरोप लावला की, 2 आणि 5 जूनला आरोपीने तिच्यावर दोनदा बलात्कार केला. ठीक होऊन घरी आल्यानंतर पत्नीने पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पतीने घटस्फोट दिला.