आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनला कोरोना:सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण, म्हणाला- काळजी घेऊन सुद्धा संक्रमण झाले; कुटुंबातील सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिनच्या कुटुंबातील सर्व लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याने शनिवारी याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. त्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सचिन सध्या होम क्वारंटाइन आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे.

सचिनने सांगितले की, मी सलग माझी टेस्ट करुन घेत होतो आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व काळजी घेत होतो. तरीही मी कोरोनाच्या विळख्यात सापडलो आहे. मी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मला सौम्य लक्षणे आढळली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन सचिनने केले आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. नुकतीच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही कोरोनाची लागण झाली आहे. देशातील अनेक दिग्गजांनाही कोरोनाने विळखा घातला आहे.

बातम्या आणखी आहेत...