आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताकडून शेजार धर्माचे पालन:शेजारील देशांच्या मदतीसाठी धावून जातोय भारत देश, भूटान, मालदिवला पाठवल्या कोरोनाच्या लस

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगामधील एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो.

भारताची लोकसंख्या जास्त असुनही भारताने कोरोना संकटावर इतर देशांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवले आहे. गेल्या 9 महिन्यांपासून देशावर घोंघावत असणारे संकट दूर करण्यासाठी देशभरात आता लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. आपल्या देशातील लोकांसोबतच आता भारत देश हा शेजारील देशांच्या मदतीलाही धावून जाताना दिसत आहे. भारताने जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारताने नुकतीच भूटान आणि मालदीव या आपल्या शेजारील देशांना भेट म्हणून कोरोना लसींचा पुरवठा केला आहे. कोरोना लस देत भारत शेजार धर्माचे पालन करत असल्याचे दिसून येत आहे.

आज भारताने काही कोरोना लसी शेजारील देशांना पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे 1.5 लाख डोस पाठवण्यात आले आहेत. यासोबतच मालदीवची राजधानी माले येथेही मुंबईमधून कोविशिल्डचे 1 लाख डोस पाठवले जाणार आहेत.

भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगामधील एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो. भारताने आजपर्यंत अनेक आजारांवर लसींची निर्मिती केली आहे. तसेच इतर देशांना औषधांचा पुरवठाही केला आहे. आता जगावरील सर्वात भयानक संकट कोरोनावरही भारताने लस निर्माण केली आहे. भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम आहे. दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आधीच नोंदणी केली आहे. दरम्यान, भूटान आणि मालदीव या शेजारील देशांना भारताने भेट स्वरुपात लस पाठवली आहे.