आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्लक सेनेचा आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न:भ्याड हल्ला करणारे सुटले, उद्धव ठाकरेंसोबत फोटोसेशन आश्चर्यकारक- नरेश मस्के

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे सेनेत झालेल्या राड्यानंतर शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका केली. शिवसेना म्हणजे शिल्लक सेना आहे, त्यांनी आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर भ्याड हल्ला करणारे त्यांचे लोक सुटले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत फोटोसेशन करणे हे आश्चर्यकारक असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

काय म्हणाले म्हस्के?

नरेश म्हस्के म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाच्या झपाट्यामुळे विचलित झालेल्या शिल्लक सेनेने वारंवार आम्हाला डिवचण्याचा केलेला प्रयत्न होत आहे, याचा मी निषेध करतो.

ती भेट आश्चर्यकारक

नरेश म्हस्के म्हणाले, दादर येथे शाखाप्रमुखावर भ्याड हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी जामिनावर सोडल्यानंतर त्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटणे आणि त्याच्यासोबत फोटो काढून घेणे हे आश्चर्यकारक आहे.

त्यानंतर मातोश्रीचे दरवाजे बंद

नरेश म्हस्के म्हणाले, बाळासाहेबांच्या निधनानंतर मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य शिवसैनिकासाठी बंद झाले होते. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील ते कधीच उघडले नाहीत, शिवसैनिकच काय मंत्री आणि आमदाराना देखील कायम तीच वागणूक मिळाली.

आता शिवसैनिकांना आठवण आली

नरेश म्हस्के म्हणाले, आता पायाखालची वाळू सरकू लागल्यावर आपल्याला शिवसैनिकाची आठवण झाली. हीच आठवण अडीच वर्षांपूर्वी काढली असती तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती. आज रविवारी दुपारची झोप टाळून तुम्ही तो वेळ सर्वसामान्य शिवसैनिकाला दिलात हे निश्चितच चांगले आहे. मात्र एका आरोपीला शिवसैनिकावर हात उगरल्याबद्दल मातोश्रीवर बोलावून त्यांच्यासोबत फोटो काढून घेणे निश्चितच भूषणावह नाही.

बातम्या आणखी आहेत...