आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल वादळ पुन्हा विधान भवनावर धडकणार:शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माकपाचा पायी लॉगमार्च; दिंडोरीतून सुरुवात

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रविवारपासून नाशिक ते मुंबई अशा शेतकऱ्यांच्या पायी लाँग मार्चला सुरुवात होणार असून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पायी लॉंग मार्च विधानभवनावर धडकणार आहे.

दिंडोरी येथील नवीन कांदा मार्केट पासून मोर्च्यास सुरुवात करण्यात आली, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्च्यांचे स्वागत तालुकाध्यक्ष अप्पा वाटणे, देविदास वाघ यांनी केले, यावेळी रस्ता अडवत रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, माजी आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांचे नेतृत्वाखाली या प्रलंबीत मागण्या सोडण्यासाठी दिनांक 12 मार्च 23 पासून दिंडोरी ते मुंबई असा शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च आयोजित करण्यात आला आहे, या मोर्चाचा पहिला मुक्काम म्हसरूळ येथे होणार आहे, यावेळी डॉ डी एल कराड, माकपचे जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, सावळीराम पवार, मोहन जाधव, सुभाष चौधरी, उत्तम कडू, देविदास वाघ, भिका राठोड, जयराम गायकवाड, आदीं मोर्चाचे नेतृत्व करत आहे, यावेळी पोलिस अधीक्षक शहाजी उमप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,

तीन तास वाहतूक ठप्प

गुजरात राज्याला जोडणारा नाशिक सापुतारा महामार्गावर मोर्च्या काढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, रविवार दिंडोरी बाजार, व रंगपंचमी असल्यामुळे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र व सप्तश्रृंगी गड येथे येणाऱ्या भाविकांना मोरच्यामुळे मनस्थाप झाला.

या लॉंग मार्च दरम्यान असलेल्या प्रमुख मागण्या

  • जमीन कसणाऱ्यांच्या नावे करून सातबारावर नाव लावावे.
  • अपात्र जमीनदाव्याची पूर्तता करून दावे पात्र करावेत.
  • प्रत्येक मंजूर प्लॉट धारकाला विहीर, सोलर वरील वीज पंप, पाईपलाईन, जमिनीचे सपाटीकरण, फळबाग, लागवड सारख्या केंद्र सरकारने प्लॉट धारकांना जाहीर केलेल्या योजना राबवाव्यात.
  • गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा.
  • ज्या गायरान जमिनीवर घरे आहेत ती घरे नियमित करा.
  • प्रधान मंत्री आवास योजनेचे अनुदान एक लाख चाळीस हजारा वरुन पाच लाख रूपये करावे.
  • वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्वे करून त्यांची नावे, ड ,यादीत समाविष्ट करावेत.
  • नार पार तापी नर्मदा नदी जोड प्रकल्प रद्द करून सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर या तालुक्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांना छोटे मोठे सिमेंट काँक्रेटचे बंधारे पाझर तलाव लघु पाटबंधारे यासारख्या योजना घेऊन प्रथम पुरेसे पाणी स्थानिकांना द्यावे.
  • शेतकऱ्यांच्या कांदा द्राक्ष व इतर शेतीपिकांना हमीभाव मिळावा.
  • लाल कांद्याला सहाशे रूपये अनुदान जाहीर करून कांदा निर्यातीचे धोरण जाहीर करा.
बातम्या आणखी आहेत...