आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:अंधेरीत बस स्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेवर कोसळली क्रेन, महिलेचा मृत्यू तर आणखी दोघे जण जखमी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुंदवली बस स्टॉपजवळ आल्यानंतर क्रेन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे क्रेन ही पिलरला धडकली.

मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेसवर अंधेरी जवळ सकाळी सहा वाजेदरम्यान एक अपघात झाला. जोगेश्वरीहून बांद्राला जाणारी मेट्रोची क्रेन अंधेरीच्या गुंदावली भागातल्या बस स्टॉपवर कोसळल्याची घटना घडली. क्रेन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, क्रेनचे दोन तुकडे झाले आहेत.

या अपघात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला बसची वाट पाहत उभी होती. याच वेळी महिलेच्या अंगावर ही क्रेन कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. फाल्गुनी पटेल असे या मृत महिलेचे नाव आहे. ही महिला क्रेनच्या मागच्या चाकांमध्ये अडकली आणि चिरडली गेली. या महिलेच्या मृतदेहाचे दोन भाग झाले आहेत. तर उभ्या असलेल्या रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस या ठिकाणी दाखल झाले.

गुंदवली बस स्टॉपजवळ आल्यानंतर क्रेन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे क्रेन ही पिलरला धडकली. क्रेनचे दोन तुकडे झाले एक भाग तिथे उभ्या असेलल्या महिलेवर तर दुसरा भाग रिक्षांवर कोसळला. या अपघाताची भीषणता दाखवणारा व्हिडिओही समोर आला आहे.