आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:झोपडपट्टी पुनर्वसनातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांबाबत सुसंगत नियमावली तयार करून लोकांना दिलासा द्यावा

मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी निश्चित आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास जर विकासकाने असमर्थता दर्शवली असेल किंवा विकासकाकडून प्रकल्पाच्या कामास विलंब होत असेल तर असे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना व विविध पर्यायांचा कसा अवलंब करता येईल याची कार्यपद्धती निश्चित करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांबाबत नियम सुसंगत हवे. कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांबाबत सुसंगत नियमावली तयार करून लोकांना दिलासा द्यावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बेघर झालेल्या लोकांची थकीत भाडे देण्यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही नियमांची शिथिलता व अंमलबजावणी, प्रकल्प कालबद्ध व विशिष्ट मर्यादित होण्यासाठी करावयाचे नियम याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...