आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या काेराेनामुळे भारतामधील परिस्थिती अधिकच गंभीर आहे. त्यामुळे आगामी दाेन महिन्यांपर्यंत काेणत्याही प्रकारच्या क्रिकेटसंबंधीचा निर्णय घेतला जाणार नाही. आम्ही आॅगस्टमध्येच क्रिकेटच्या सरावाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष साैरव गांगुलींनी दिली. त्यामुळेच आता आॅगस्टपूर्वी मैदानावरच्या क्रिकेट सरावाला सुरुवात हाेण्याची शक्यता नाही, असेच स्पष्ट संकेत गांगुलींनी दिले.
अचानक आलेल्या काेराेनाच्या संकटामुळे मागील तीन महिन्यांपासून जगभरातील क्रीडाविश्व पूर्णपणे ठप्प झालेले आहे. याचाच माेठा फटका भारतीय क्रिकेटलाही बसला आहे. क्रिकेटचा सराव पूर्णपणे बंद आहे. मात्र, राेहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि ईशांत शर्मा यांनी घरीच सराव कायम ठेवला आहे.
याशिवाय श्रीलंका, अफगाणिस्तान, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील मंडळानेही क्रिकेटच्या सरावाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे येथेही आता स्पर्धा आयाेजनाला सुरुवात हाेईल.
आयपीएलची तयारी आता जाेर धरून यंदाच्या सत्रातील आयपीएलचे आयाेजनही महामारीच्या संकटामुळे अडचणीत सापडलेले आहे. यासाठी बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित असल्याची घाेषणा केेली. मात्र, सध्याची परिस्थिती पूर्णपणे आटाेक्यात आल्यानंतर लीग आयाेजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. त्यामुळे सप्टेंबर-आॅक्टाेबरमध्ये लीगचे आयाेजन हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बीसीसीआय देखील अधिकच उत्सुक आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.