आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण:राणे बंधुविरोधात गुन्हा, हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल तर शंभरवेळा करेल - नितेश राणे

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे बोलायचे ते पोलिसात बोलणार आहे. हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा शंभरवेळा करेल. मी दंगल कुठे भडकवली, हिंदु म्हणुन भूमिका मांडली. राज्य सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही. एवढाच त्यांना दाऊदचा पुळका असेल तर त्यांनी महात्मा गांधींचे फोटोंऐवजी दाऊदचे फोटो भिंतीवर लावावे असा टोलाही भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केली. या पार्श्वभूमीवर राज्याचे वातावरण तापलेले असून भाजपा नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचे विधान केले. आमदार नितेश राणे यांच्याकडूनही अशा प्रकारची विधाने केली गेल्याने मरीन ड्राईव्ह पोलिसांनी राणे बंधूंविरोधात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

गुन्हा नोंद झाल्यानंतर भाजप नेते नितेश राणे माध्यमांशी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, जे बोलायचे ते पोलिसात बोलणार आहे. हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा शंभरवेळा करेल.

मी दंगल कुठे भडकवली. हिंदु म्हणुन भूमिका मांडली. राज्य सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही. एवढाच त्यांना दाऊदचा पुळका असेल तर त्यांनी महात्मा गांधींचे फोटोंऐवजी दाऊदचे फोटो भिंतीवर लावावे. देशविघातक कृत्य करणाऱ्या दाऊदबद्दलच मी बोललो कुणाच्या विरोधात बोललो नाही असेही नितेश राणे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...