आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकलेला पगार मागताच मालकाने उगारला चाकू:नवी मुंबईत जखमी कामगारावर उपचार सुरू, CCTV मध्ये कैद झाला हल्ला

नवी मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पगाराची थकबाकी मागायला गेलेल्या कामगारावर मालकासह सहकाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुकानात सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

नवी मुंबईतील कळंबोली परिसरात ही घडलेल्या घटनेनंतर छोटूने मालकासह सहकाऱ्याविरोधात तक्रार दिली आहे. छोटू रामसागर राय असे जखमी कामगाराचे नाव आहे. जखमी छोटूवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नेमकी घटना काय?

नवी मुंबईत एवन स्वीट मार्टमध्ये कामगाराच्या पगारातून वाद झाला. दुकानात काम करणाऱ्या छोटूने पगाराची थकबाकी मागितली म्हणून मालकासह सहकाऱ्याने त्याला बेदम मारहाण केली आहे. पैसे मागितल्याने दुकानाचे मालक पासवान याने छोटूवर चोरीचा आरोप करत शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली, असा आरोप छाेटूने केला आहे. नवी मुंबईतील कळंबोली कॉलनीमध्ये सेक्टर 1 परिषदच्या एवन स्वीट मार्टमध्ये ही घटना घडली आहे. ​​​​​​

पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

छोटूने दिलेल्या फिर्यादीनुसार दुकानाचे मालक संतोष पासवान आणि हसूराम चौधरी यांच्याविरुद्ध कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...