आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात गुन्हेगारी:मुंबईत कोरोना साथरोगाच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 125 टक्क्यांनी वाढ

विनोद यादव | मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन महिन्यांत महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 50 टक्के घट, 14 प्रकरणांत 398.63 कोटींचे आर्थिक गुन्हे
  • सायबर गुन्हेगारीतील 92 टक्के प्रकरणे मुंबई पोलिस सोडवू शकली नाहीत

देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत कोरोना साथरोगाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत एप्रिल-मेमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 125 टक्के वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत या दोन महिन्यांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये 49.78 टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे जानेवारी ते मे या काळात 398.63 कोटी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्यांची एकूण 14 प्रकरणे नोंदली गेली. मुंबई पोलिसांनी कोरोना संकट असूनही ही सर्व प्रकरणे निकाली काढली.

मे मध्ये 2,532 प्रकरणे, 72% निकाली आणि 27% तसेच राहिले

मुंबईत मे महिन्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, लूट, वसूली, चोरी, बलात्कार, विनयभंग आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड यांसासह एकूण 2,532 आणि एप्रिलमध्ये 5,703 गुन्हे दाखल झाले. याप्रकारे एप्रिल आणि मे दरम्यान एकूण 8,235 गुन्हे दाखल झाले तर मार्च माहिन्यात 3,660 गुन्हे दाखल झाले होते. 25 मार्च रोजी देशात लॉकडाउन लावण्यात आला. त्या तुलनेत एप्रिल-मेमध्ये गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण 125% वाढले. मे महिन्यात 72.20 टक्के (1,828) निकाली काढण्यात पोलिसांनी यश आले. तर 27 टक्के (704) सोडवता आली नाहीत. एप्रिल महिन्यात मुंबई पोलिसांनी 5,703 प्रकरणांतील 89.65 टक्के (5,113) प्रकरणे निकाली काढली होती, तर 10.35 टक्के (590) निकाली काढता आली नाहीत. 

महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये घट, तरी दोन महिन्यांत बलात्काराच्या 36 घटना घडल्या 

मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाव्हायरसचा संसर्ग पसरण्यास सुरूवात झाली तेव्हा महिलांवरील गुन्हेगारीच्या एकूण 452 घटना नोंदल्या गेल्या. त्यानंतर एप्रिलमध्ये 89 आणि मेमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 138 घटना घडल्या. मार्चच्या तुलनेत एप्रिल-मेमध्ये सुमारे 50 टक्के (225 प्रकरणे) कमी घटना घडल्या. असे असूनही, आयपीसीच्या कलम 376 नुसार मे मध्ये बलात्काराच्या 19 आणि एप्रिलमध्ये 17 गुन्हे नोंदविण्यात आले. अशाप्रकारे, कोरोना साथ रोगाच्या काळात मुंबईत बलात्काराच्या 36 घटना घडल्या. ज्यामध्ये 9 अल्पवयीन मुलीही बलात्काराला बळी पडल्या. मार्चमध्ये बलात्काराच्या 73 घटना आणि फेब्रुवारीमध्ये 70 घटना घडल्या होत्या.

पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांची 100 टक्के प्रकरणे सोडवली

जानेवारी ते मे या कालावधीत मुंबईत आर्थिक गुन्ह्यांची एकूण 14 प्रकरणे नोंदली गेली. ज्यात एकूण 398.63 कोटींच्या मालमत्तेची फसवणूक होती. ही सर्व प्रकरणे सोडविण्यात मुंबई पोलिसांना यश आले. जानेवारी 2019 ते मे 2019 या कालावधीत एकूण 39 आर्थिक गुन्हे दाखल झाले होते. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मुंबईत या वेळी कोरोना महामारीमुळे आर्थिक गुन्हेगारीची 25 कमी प्रकरणे नोंदली गेली.

सायबर गुन्हेगारीतील 92 टक्के प्रकरणे मुंबई पोलिस सोडवू शकले नाहीत

मुंबई पोलिस यावर्षी सायबर गुन्हेगारीशी निगडीत 92 टक्के (866) प्रकरणे सोडवू शकली नाही. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत सायबर गुन्हेगारीची एकूण 938 गुन्हे दाखल झाले होते. यातील फक्त 8 टक्के (72) प्रकरणे पोलिसांना निकाली काढता आले. 2019 मध्ये मे महिन्यापर्यंत एकूण 788 गुन्हे दाखल झाले होते. ज्यातील 11 टक्के (90) प्रकरणे पोलिसांनी निकाली काढली. मागील वर्षी देखील मे महिन्यापर्यंत एकूण दाखल गुन्ह्यांपैकी जवळपास 88.58 टक्के (698) प्रकरणे मुंबई पोलिसांना निकाली काढता आली नाही. 

बातम्या आणखी आहेत...