आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका:राज्यपाल कोश्यारींविरोधात मुंबई कोर्टात फौजदारी याचिका दाखल

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. दीपक जगदेव यांनी ही याचिका दाखल केली असून राज्यपाल वादग्रस्त विधान करून समाजातील शांतता, एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. संबंधित याचिकेवर लवकरच सुनावणी होईल, असे सांगितले जात असून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केल्याचा आरोप या याचिकेत जगदेव यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...