आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचं टीकास्त्र:मराठा आरक्षणाबाबत भाजपची दुतोंडी भूमिका उघड, संभाजीराजेंना बोलण्याची संधी नाकारण्याचा प्रयत्न दुर्दैवी; अशोक चव्हाणांची टीका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सध्या १०२व्या घटनादुरुस्तीचा मुद्दा जास्तच चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला चांगलेच घेरले आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, बाळू धानोरकर, शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेतील आरक्षणाच्या लढाईतील योद्धे आहेत. या निमित्ताने भाजपची दुतोंडी भूमिका उघड झाली आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

प्रसिद्धीपत्रक काढून चव्हाण यांनी ही टीका केली आहे. खासदार संभाजीराजे यांचा अपवाद वगळता भाजपचे अन्य खासदार हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून होते. आता भाजपने समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, यातून काहीही फायदा होणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे आता आरक्षणाबाबत भाजपची दुतोंडी भूमिका उघडी पडली असल्याचे चव्हाण म्हणाले.

लोकसभा व राज्यसभेत काय घडले, ते उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिले. आता भाजपने मराठा समाजाची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याला बळी पडणार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...