आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nana Patole Criticism On Bjp And Central Govt. For Agnipath Scheme |Did The Center Name The Scheme Agneepath Because It Set Fire To The Youth?

'अग्निपथ'मुळे तरुण उद्धवस्त होतील:नाना पटोलेंची टीका, केंद्राने तरुणांना आगीत टाकले म्हणून योजनेला अग्निपथ नाव दिले का?

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अग्निपथ नाव हे का ठेवले हाच मोठा प्रश्न; तरुणांना उद्धवस्त करण्याचे काम भाजप करत आहे -पटोले

अग्निपथमुळे तरुण उद्धवस्त होतील. अग्निपथ नाव हे का ठेवले हाच मोठा प्रश्न आहे. तरुणांना आगीमध्ये टाकले म्हणून 'अग्निपथ' नाव दिले का, असा सवाल शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारला विचारला. केंद्राने लष्कर भरतीसाठी अग्निपथ या योजनेची घोषणा केली असून, त्याला देशभरातून विरोध होत आहे.

पटोले म्हणाले की, या देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याबरोबरच देशाला विकसनशील बनवण्याचे काम देखील काँग्रेसने केले. मात्र, मोदींकडून देशातील तरुणांची थट्टा केली जात असून, अग्निपथ या योजनेच्या माध्यमातून या देशातील तरुणांना उद्धवस्त करण्याचे काम भाजप करत आहे. मात्र, भाजपची ही नीती काँग्रेस चालू देणार नाही, आम्ही देखील तरुणांसोबत रस्त्यावर उतरणार आहे. असा इशारा त्यांनी दिला.

तरुणांना आगीमध्ये झोकले

पटोले म्हणाले की, लष्करभरतीसाठी जी जुनी पद्धत होती तीच योग्य आहे आणि तीच पद्धत देशातील तरुणांना हवी आहे. आठ वर्ष भाजपने या तरुणांना आगीमध्ये झोकले असून, त्यामुळे केंद्र सरकारने हे नाव दिले, त्यांनी अगोदर हे नाव का ठेवले याचे स्पष्टीकरण द्यावे. तरुणांची, देशाच्या सुरक्षेबद्दल चेष्ठा करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये, लेह-लडाखमध्ये ताबा घेतला आहे. त्यावर केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही. देशाच्या सुरक्षेबद्दल गंभीर नसलेले हे केंद्र सरकार आहे. त्यामुळे या सरकारचा धिक्कार तरुणांच्या वतीने संपूर्ण देशामध्ये होत असल्याचे ते म्हणाले.

भाजप खोटे बोलते

देशात अग्निपथचा वाढता विरोध पाहता केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफल्समध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचे निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या आश्वासनांना कुठली मान्यता द्यायची आहे. भाजपने खोटे बोलल्याशिवाय काहीच केले नाही. 2014 पासून भाजपने या देशातील जनतेशी खोटे बोलले आहे, दोन कोटी नोकऱ्या देऊ, 15 लाख रुपये असे खोटे आश्वासन दिले आहे.

10 टक्के आरक्षण

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. अग्निवीरांना दोन दलांमध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट देण्यात आली होती. अग्निवीरच्या पहिल्या बॅचसाठी वयाची शिथिलता 5 वर्षे असेल.

काँग्रेसची आंदोलनाची हाक

देशभरात गदारोळ सुरू असताना काँग्रेस पक्षानेही अग्निपथ योजनेला विरोध करण्याची घोषणा केली आहे. रविवारी दिल्लीतील जंतरमंतरवर काँग्रेस नेते आंदोलन करणार असून, त्यात पक्षाचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...