आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या वेगळ्या अंदाजाविषयी ट्विट करणाऱ्या मुंबई पोलिसांनी क्रिप्टो चलनाविषयी गुंतवणूकदारांना सावध केले आहे. मुंबई पोलिसांनी क्रिप्टोमध्ये कोणत्याही संशोधनाशिवाय गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला आहे.
पोलिस आयुक्तांच्या हँडलवरुन केले ट्विट
मुंबई पोलिस आयुक्ता (सीपी मुंबई पोलिस) च्या सोशल मीडियावर लिहिले आहे की एखाद्याच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याही संशोधनाशिवाय क्रिप्टो चलनामध्ये गुंतवणूक केल्यास तुमच्या जीवनातील बचत संपू शकते. तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी ऑनलाईन व्यापाराविषयीच्या प्रत्येक पद्धतीची माहिती असणे आवश्यक आहे.
सायबर सेफ्टी हॅश टॅगसह सोशल मीडिया पोस्ट
मुंबई पोलिसांनी सायबर सेफ्टी हॅश टॅगसह सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात मुंबई पोलिसांच्या लोगोसह बिटकॉइनचा ग्राफ आहे. यामध्ये बिटकॉइनचे भाव वर जाणे आणि खाली येण्याच्या रुपात दाखवण्यात आले आहेत. जेव्हा बिटकॉइनचे भाव वाढतात तेव्हा यात जास्त रिटर्न आणि खाली आल्यावर जास्त जोखिम दाखवण्यात आली आहे. म्हणजेच जेवढा जास्त फायदा तितकी जास्त जोखिम आहे.
खरेतर सायबर क्राइम फ्रॉड आणि विचारपूर्वक गुंतवणूक न केल्यास मुंबई पोलिसांची ही पोस्ट गुंतवणूकदारांसाठी आहे. सध्याच्या काळात क्रिप्टो चलनाच्या किंमतीमध्ये चांगलीच घट झाली आहे.
सर्व क्रिप्टो चलनांच्या किंमतींमध्ये प्रचंड घट
गेल्या 24 तासांत सर्व क्रिप्टो चलनांच्या किंमतींमध्ये 25% घट झाली आहे. त्यात सर्वाधिक लोकप्रिय चलन बिटकॉईनच्या किंमतींमध्ये 8% घट झाली आहे. तर इथरियमची किंमत 21% खाली आली आहे. बिनान्स कॉइन, एक्सआरपी आणि कार्डानोचे भाव 10% पेक्षा जास्त खाली आहेत. विशेष म्हणजे हे चलन मोठ्या किंमतीला विकल्या गेले आहेत. याचा अर्थ असा की या चलनातील पडझड पुढेही चालू राहू शकते.
क्रिप्टो मार्केट अस्वलच्या नियंत्रणाखाली आहे
क्रिप्टो मार्केट सध्या अस्वलच्या नियंत्रणाखाली आहे. बिटकॉइनची किंमत, 31,938 हजार डॉलरच्या लेव्हलवर पोहोचली आहे. इथरियमची किंमत 1,890 डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, बिनान्स कॉइनच्या किंमतीत 10.72% घट झाली आहे, तर डागकॉइनच्या किंमतींमध्ये 19.26%ची घट झाली आहे. ते अर्ध्या डॉलरपेक्षा खाली पोहोचले आहे. इथरियमची किंमत 1,900 डॉलरच्या खाली पोहोचली आहे.
पोलकाडाटच्या किंमतींमध्ये 20.49% ची घट झाली आहे. हे 9.60 डॉलरवर व्यवसाय करत आहे. यूनिस्वॅपच्या किंमतींमध्ये 10% ची घट झाली आहे. हे 17.5 डॉलरवर व्यवसाय करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.