आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इशारा:तब्बू, तापसी पन्नू व अनुष्का शर्मा यांना इंटरनेटवर सर्च केल्यास अडचणीत याल, सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनीचा इशारा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या व्यक्तींना इंटरनेटवर सर्च केल्यास व्हायरस घुसण्याची शक्यता,कंपनीने तयार केली यादी

अँटी व्हायरस तयार करणाऱ्या सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनीने मंगळवारी एक यादी तयार केली आहे. त्यांनी इशारा दिला की, खालील व्यक्तींना इंटरनेटवर सर्च केल्यास व्हायरस घुसण्याची शक्यता आहे.

धोकादायक व्यक्तींच्या यादीत बॉलीवूड अभिनेत्री तब्बू, तापसी पन्नू, अनुष्का शर्मा व सोनाक्षी सिन्हासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या यादीत फुटबॉलपटू ख्रिस्टियानो राेनाल्डो प्रथम स्थानी, दुसऱ्या स्थानावर तब्बू, तिसऱ्या स्थानी तापसी पन्नू व चौथ्यावर अनुष्का शर्मा, पाचव्या स्थानी सोनाक्षी सिन्हा यांची नावे आहेत.

सहाव्या स्थानी गायक अरमान मलिक, सातव्या सारा अली, आठव्या टीव्ही कलावंत दिव्यांका त्रिपाठी, आदीं कलावंतांची नावे आहेत. कंपनीने म्हटले, लोक मोफत सिनेमा, वेब सिरीज आदी पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते सुरक्षेशी तडजोड करतात आणि त्यांचे डिजिटल आयुष्य जोखमीत टाकतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser