आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'गुलाब' चक्रीवादळाचा कहर अजून थांबलेला नाही तोच नवीन वादळ 'शाहीन' च्या भीतीने महाराष्ट्र आणि गुजरातच्या लोकांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या मते, अरबी समुद्रात 'शाहीन' वादळ उठेल आणि महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव दिसून येईल. हे पाहता हवामान विभागाने गुजरातच्या 20 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या जवळ गेले आहे. यामुळे, कोलकाता व्यतिरिक्त, उत्तर आणि दक्षिण 24 परगना, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम, हावडा, हुगली, पूर्व-पश्चिम बर्धमान आणि बीरभूम जिल्ह्यांमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. कोलकात्याच्या अहिरटोला येथे मुसळधार पावसामुळे एका घराचा काही भाग कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही.
शाहीनचा महाराष्ट्र, गुजरातवर किती परिणाम होईल?
हवामान खात्याच्या मते शाहीन हे वादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या किनाऱ्यांना धडकणार नाही. हे 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या दूरुन ओमानच्या दिशेने जाईल, परंतु यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल.
...तर येईल शाहीन चक्रीवादळ
गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण ते दक्षिण गुजरात असा प्रवास करत गुरुवारपर्यंत अरबी समुद्राकडे येईल. याला अधिकची ऊर्जा मिळाल्यास त्याचे पुन्हा चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ही एक दुर्मिळ घटना राहील. या चक्रीवादळाला शाहीन हे नाव कतारने सुचवले असून त्याचा अर्थ गरुड असा आहे. सध्या उत्तर कोकण ते उत्तर आंध्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे २९ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात कोकण, मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.