आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्ग चक्रीवादळ:मुंबईवर उद्या धडकणार चक्रीवादळ निसर्ग; दोन मीटर उंच लाटांची शक्यता, ताशी 100 किमी वेगाने वाहणार वारे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मच्छिमारांना समुद्रातून परतण्याचे निर्देश, अमित शहांनी केली उद्धव ठाकरेंशी चर्चा

कोरोनाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रावर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन ठेपले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागांवर 3 जून रोजी चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सर्वच किनारपट्टीलगत भागांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात बनत असलेल्या कमी दाबाच्या पट्टयावरून भारतीय हवामान विभागाने हा इशारा दिला. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, येत्या 12 तासांत वेगवान वारे वाहतील. त्याचेच चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे, मुंबई आणि सभोवतालच्या भागात अलर्ट जारी करण्यात आला. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे दोन पथक पालघर, तीन मुंबईत, एक ठाणे, दोन रायगड आणि एक रत्नागिरी येथे तैनात करण्यात आले आहेत.

मच्छिमारांना समुद्रातून परतण्याचे निर्देश

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हा दबाव ताशी 11 किमीच्या वेगाने पूर्व आणि मध्य अरबी समुद्रातून उत्तरेकडे सरकत आहे. मंगळवारी सकाळी साडे पाच वाजल्यापासून त्यात वेग आला आहे. सध्या पणजीपासून 280 किमी दूर पश्चिम-दक्षिण, मुंबईपासून 490 किमी दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि सुरत येथून 710 किमीवर दक्षिण-दक्षिणी पश्चिम येथे केंद्र आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, या चक्रीवादळामुळे समुद्रात 2 मीटर उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि रायगडच्या खालच्या भागांवर दिसून येईल. त्यामुळेच मच्छिमारांना सागरातून परत येण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोबतच, किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना दूर पाठवले जात आहे.

अमित शहांनी केली उद्धव ठाकरेंशी चर्चा

मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ काँफ्रंसिंगच्या माध्यमातून बातचीत केली. यामध्ये राज्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. एनडीआरएफचे महासंचालक एसएन प्रधान यांनी सांगितले, चक्रीवादळ निसर्गमुळे ताशी 90-100 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे, महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर असलेल्या लोकांना दूर नेण्याचे काम सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...