आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात निसर्ग वादळ:कोरोना महामारीदरम्यान राज्याच्या किनारपट्टीवर मोठ्या वादळाचा इशारा, 6 जिल्ह्यात एनडीआरएफच्या 9 टीम तैनात

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी सागरात दोन वादळ बनत आहेत

कोरोना महामारीचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रावर आता ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका आलाय. हवामान खात्याने सांगितल्यानुसार, 4 आणि 5 जूनला राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 'निसर्ग' 3 जूनला गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहचेल. यापूर्वीच्या तयारींसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी सोमवारी नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (एनडीएमए)च्या अधिकाऱ्यांसोबत हाय लेव्हल मीटिंग केली. दरम्यान, वादळ आल्यावर 100 किलोमीटर प्रती तासांच्या वेगाने वारे वाहतील. समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना परत बोलवले आहे.

पुढील 48 तासात वाढेल तीव्रता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी सागरात दोन वादळ बनत आहेत. यातील एक आफ्रीकन किनारपट्टीकडून ओमानकडे जाईल, तर दुसरा भारताजवळ अरबी सागरात साउथ ईस्ट-ईस्ट-सेंट्रल क्षेत्रात तयार होत आहे. पुढील 48 तासात याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिमकडे वाढत हे वादळ 3 जूनपर्यंत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकेल.

राज्यात 9 पथकांची तैनाती

या आपत्तीला पाहता नॅशनल डिजास्टर रिस्पांस फोर्स (एनडीआरएफ) ची 9 पथके महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. यातील तीन टीम मुंबईमध्ये, दोन पालघर आणि एक-एक टीम ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तैनात आहेत. एनडीआरएफच्या टीम्स महाराष्ट्र सरकार, हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासन सतत नागरिकांच्या संपर्कात आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser