आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चक्रीवादळ गाईडलाइन:महाराष्ट्राला धडकले निसर्ग चक्रीवादळ; मुख्यमंत्री कार्यालय आणि बीएमसीने सांगितले, काय करावे आणि काय नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीव्ही आणि रेडिओ किंवा माध्यमावर अधिकृत सूचना आल्याशिवाय त्याचे पालन करू नका

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रावर धडकले आहे. अलीबागमध्ये बुधवारी दुपारी हे चक्रीवादळ धडकताना याची स्पीड ताशी 94 किमी होती. या दरम्यान, ताशी 120 किमी वेगाने वारे वाहत होते. मुख्यमंत्री कार्यालय आणि  मुंबई महानगरपालिकेने अशात नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये त्यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. ठिक-ठिकाणी वादळ धडकण्यापूर्वीच लाउडस्पीकरमध्ये लोकांना सतर्क करण्यात आले.

काय करावे?

घरातून बाहेर असलेल्या वस्तू घराने बांधून घ्या, किंवा आतमध्ये ठेवा.

आवश्यक कागदपत्रे आणि मोल्यवान वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा.

मोबाइल फोन, पॉवर बँकसह बॅटरीवर चालणारी उपकरणे आधीच चार्ज करून ठेवा.

टीव्ही आणि रेडिओवर केवळ अधिकृत निर्देशांचे पालन करा.

खिडक्यांपासून दूर राहा, त्या बंदच ठेवा. जेणेकरून हवेचा दबाव नियंत्रित राहील.

आपत्तीच्या वेळी घरातील टेबल आणि मजबूत फर्निचरच्या खाली जाउन स्वतःला सुरक्षित ठेवा.

वीजेवर चालणारी अनावश्यक उपकरणे बंद ठेवा.

ऑडिटोरिअम किंवा मॉलसारख्या मोठे छत असलेल्या बांधकामांखाली आश्रय घेऊ नका.

काय करून नये?

अफवांवर लक्ष ठेवू नका.

चक्रीवादळात वाहन चालवू नका.

जुन्या किंवा कमकुवत इमारतींपासून दूर राहा.

जखमी झालेल्या व्यक्तीला नेण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित वातावरण असल्याची खात्री पटल्याशिवाय बाहेर नेऊ नका.

तेल किंवा ज्वलनशील पदार्थ सांडल्यास वेळीच साफ करून घ्या.

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, सागरापासून दूरच राहावे.

0