आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतून ग्राउंड रिपोर्ट:मुंबईत पोहोचण्यापूर्वी 50 किमी दक्षिणेस सरकले चक्रीवादळ, सुदैवाने जेवढ्या नुकसानीची शक्यता होती, तेवढे झाले नाही

विनोद यादव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी रात्रीपासूनच प्रशासनाने वादळाशी लढा देण्याची तयारी सुरू केली होती, 40 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
  • नरीमन पॉईंट, कफ परेड, कांदिवली (पश्चिम), नागपाडा भागात झाडे उन्मळून पडली

'निसर्ग' चक्रीवादळ कोरोनाचे केंद्र बनत असलेल्या मुंबईच्या दक्षिण भागाकडून निघून गेले. मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊन झाला, हवेचा वेग 100 किमी प्रति तासच्या वर पोहोचला होता. सीसीआय नरीमन पॉईंट, कफ परेड, कांदिवली (पश्चिम), नागपाडा, भायखळा आणि काळाचौकी यांसारख्या काही भागात झाडे उन्मळून पडली, घरांचे छत उडाले. सुदैवाने जितक्या नुकसानाची शक्यता वर्तवण्यात आली तेवढे नुकसान झाले नाही.  

कुलाब येथील हवामान खात्याचे उपसंचालक कुश्नानंद होसाळीकर म्हणाले की, मुंबईच्या किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वी हे वादळ 50 किमी दक्षिणेस सरकले होते. यामुळे मुंबईला या वादळाचा तेवढा तडाखा बसला नाही जेवढी शक्यता वर्तवण्यात आली होती. भौगोलिक स्थितीमुळे मुंबईत आजपर्यंत एकही चक्रीवादळ धडकले नाही.

हा फोटो मुंबईतील मरीन ड्राईव्हचा आहे. 'निसर्ग' वादळामुळे समुद्रात सहा फुटांपर्यंतच्या लाटा उसळण्याचा इशारा होता. त्यामुळे येथे लोकांच्या प्रवेशावर बंदी होती.
हा फोटो मुंबईतील मरीन ड्राईव्हचा आहे. 'निसर्ग' वादळामुळे समुद्रात सहा फुटांपर्यंतच्या लाटा उसळण्याचा इशारा होता. त्यामुळे येथे लोकांच्या प्रवेशावर बंदी होती.

रविवारीपासूनच सुरु केली होती तयारी 

मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहन म्हणाले की, चक्रीवादळाची येण्याची घटना आमच्यासाठी धक्कादायक होती, कारण 1891 नंतर मुंबईने कधीही चक्रीवादळाच्या संकटाचा सामना केला नव्हता. आम्ही याच्याशी लढा देण्याचे ठरवले. यासाठी रविवारी रात्रीपासून तयारी सुरू केली होती.  

चहन म्हणाले की, किनारपट्टी, खालच्या भागात व झोपडपट्टी भागातील लोकांना सोमवारी सुरक्षित ठिकाणी हलविणे हे आमचे पहिले लक्ष्य होते. याशिवाय चक्रीवादळाने एकाही व्यक्तीचा जीव जाणार हा आमचा प्रयत्न राहिला. मुंबईची किनारपट्टी आणि सखल भागातील सुमारे 30 लोक स्वतः सुरक्षित ठिकाणी गेले होते. तर मनपाने सुमारे 10 हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते. 

महापौर किशोरी पेडणेकर यांनी गिरगाव येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी लोकांना बीचवर न जाण्याचे आवाहन केले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी गिरगाव येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी लोकांना बीचवर न जाण्याचे आवाहन केले.

कुलाब्यात 24 तासांत 71.85 मिमी पाऊस

मुंबई मॉसेनेट ऑब्झर्वेशनच्या आकडेवारीनुसार दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात गेल्या चोवीस तासांत 71.85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मागील 12 तासांत नरीमन पॉईंट, तारापोरवाला मत्स्यालय, ग्रँट रोड, नायर रुग्णालय परिसर, हाजी-अली, वरळी, दादर, वडाळा, कुर्ला, नवी मुंबईच्या सीबीडी बेलापुर भागात 20 ते 40 मिलीमीटर पाऊस झाला. 

मुंबई विमानतळावर विमानांची वाहतून बंद

मुंबई विमातळावर विमानांची वाहतून बुधवारी दुपारी 2 वाजेनंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. निसर्ग चक्रीवादळामुळे विमातळ परिसरात जोरदार वाऱ्यामुळे बंगळुरूहून आलेल्या फेडएक्स विमान 5033 ला लँडिगवेळी अडचणीचा सामना करावा लागला होता. यानंतर विमान सुस्थितीत लँड झाले. जोरदार वाऱ्यामुळे विमान वाहतूक संध्याकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवली होती. सकाळी मुंबई विमातळावरून 19 विमानांच्या वाहतूक होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. एअर एशिया, एअर इंडिया, इंडिगो, गोएअर आणि स्पाइस जेट सारख्या एअरलाइन्सनी आपली सेवा जारी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 

जेव्हा वादळ अलिबागला धडकले, तेव्हा ते मुंबईच्या समुद्रात असेच दृश्य होते

बातम्या आणखी आहेत...