आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र होत आहे चक्रीवादळ 'तौक्ते':गुजरातकडे सरकत आहे वादळ, मुंबईसहित, उत्तर कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासार मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात आणि महाराष्ट्रासहित पाच राज्यांवर अरबी समुद्रात तयार होत असलेल्या 'ताैक्तेे' चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागानुसार हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत १८ मे रोजी गुजरातेतील द्वारका येथे धडकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात आज कोकण, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भात सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

आयएमडीच्या अहवालानुसार, शनिवारी मध्यरात्री उशिरा 2.30 वाजता हे वादळ गोव्याच्या पणजी किनाऱ्यापासून 150 किलोमीटर दक्षिण पश्चिममध्ये, मुंबईपासून 490 किलोमीटर दक्षिण, गुजरातच्या वेरावलपासून 880 किलोमीटर -दक्षिण पश्चिमध्ये होते. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 150 ते 160 किमी राहील. महाराष्ट्र, गुजरात आणि केरळच्या किनारपट्टीवर तीन दिवस वादळाचा परिणाम राहण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम राजस्थान आणि लक्षद्वीपवरही होऊ शकतो. या चक्रीवादळाचे नाव म्यानमारने 'तौक्ते' ठेवले आहे.

मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
या वादळाचा धोका पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान कार्यालय (PMO) कडून सांगण्यात आले की, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातमधील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मंत्रिमंडळ सचिव किनाऱ्यावरील मुख्य सचिव आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये / संस्था यांच्याशी सतत संपर्कात राहतील असे बैठकीत सांगण्यात आले. गृह मंत्रालय चोवीस तास याकडे लक्ष ठेवेल आणि राज्यांशी संपर्क साधताना आवश्यक त्या सुविधा त्वरित पुरवेल.

NDRF च्या 53 टीम अलर्टवर
NDRFचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले - केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र या किनारपट्टी भागात एनडीआरएफची 53 पथके तैनात आहेत.

वायुसेना अलर्ट; मच्छिमारांना इशारा देण्यात आला

  • वादळाची शक्यता पाहता भारतीय हवाई दलही सतर्कतेच्या मोडमध्ये आहे. हवाई दलाने 16 ट्रान्सपोर्ट विमान आणि 18 हेलिकॉप्टरला मदत व बचाव कार्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
  • गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्रच्या किनारपट्टी भागात तटरक्षक दल सतर्क आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रापासून दूरच राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरातवर सर्वाधिक परिणाम
या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. द्वारका, कच्छ, पोरबंदर, जुनागड, गिर सोमनाथ, अमरेली, राजकोट, मोरबी आणि जामनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी घरे पूर्णपणे उध्वस्त होऊ शकतात, मातीच्या घरांनाही मोठे नुकसान होईल, पक्की घरांचेदेखील काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. मुसळधार पावसामुळे काही भागात पूरसदृश परिस्थिती उद्भवू शकते.

बातम्या आणखी आहेत...