आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रीवादळ:​​​​​​​गोव्यात तौक्ते वादळाचा धुमाकूळ, झाडे उन्मळून पडली; कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोव्यात तौक्ते वादळामुळे दाणादाण उडाली आहे.

अरबी समुद्रात घोंघावत असणाऱ्या चक्रीवादळाने गोव्यात दाणादाण उडवली आहे. या तौक्ते चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. या वादळामुळे कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. चक्रीवादळाचा वेग यापेक्षा जास्त वाढू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाकडून सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यासोबतच या चक्रिवादळामुळे गोव्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वीज कनेक्शन कट झाले आहे. तर केरळच्या अनेक जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे.

हवामान विभागानुसार, हे चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीला धडकले आहे. आता गुजरातकडे वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे मुंबईसह उत्तर कोणकणात काही ठिकाणी तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे.

गोव्यात तौक्ते वादळामुळे दाणादाण उडाली आहे. अनेक झाडेही उन्मळून पडली आहेत. हे वादळ आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकत आहे.

भोरगिरी व भिवेगाव ता खेड ,पुणे येथे वादळी वा-यामुळे सुमारे 70 घरांचे व 2 आंगणवाड्या व 1 प्राथमिक शाळा 1 ग्रामपंचायत इमारत यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात जोरदार पाऊस
हवामान विभागाचे अधिकारी के एस होसाळीकरांनी आपल्या ट्विटर अकाउंवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. सिंधुर्गामध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. तुफान वाऱ्यामुळे सिंधुदुर्गात काही झाडे, विजेचे पोल उन्मळून पडल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...