आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Cyclone Tauktae Latest Update; Rain Help Kapas Bajre Kheti Benefit In Maharastra, Gujarat Rajasthan; News And Live Updates​​​​​​​

'तौक्ते'चा शेतकर्‍यांना फायदा:​​​​​​​महाराष्ट्रासह या राज्यांत कापूस, बाजरी आणि मुगाच्या लागवडीखालील क्षेत्रात होणार वाढ, परंतु तौक्तेमुळे बंदरांच्या पुरवठ्यावर परिणाम

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाह्य देशांतून खरेदी केले जाणार्‍या वस्तुंच्या किंमती वाढणार

अरबी समुद्रात तयार झालेल्या 'तौक्ते' चक्रीवादळाने महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात आणि राजस्थानमध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळामुळे संबंधित राज्यांतील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, आता हे चक्रीवादळ या राज्यांतील शेतकर्‍यांना वरदान ठरणार आहे. कारण यामुळे कापूस, बाजरी आणि मुगाची लागवड वेळवर होईल. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा आणि कर्नाटक राज्यात लागवडीखालील क्षेत्रात वाढ होणार आहे.

एकीकडे हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात नुकसान करत असून दुसरीकडे यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. परंतु, याचे सर्वात जास्त परिणाम बंदरांच्या पुरवठ्यावर झाले आहे. अशावेळी खाद्य तेल आणि बाहेरील देशातील खरेदील होणार्‍या वस्तूंच्या किंमती मात्र वाढणार आहे.

समुद्रातील हालचालीमुळे पुरवठ्यावर परिणाम
कमोडिटी एक्सपर्ट अजय केडिया यांच्या मते, हा कालावधी कापूस पेरणीचा आहे. या चक्रीवादळामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले नाही. परंतु साठवण कमी झाल्याने पिकांचे नुकसान होण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे या चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु होत्या. त्यामुळे बंदरांवरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. या चक्रीवादळाचा प्रभाव हा गुजरात आणि महाराष्ट्रातील बंदरांवर दिसला. विशेष म्हणजे या दोन बंदरावरूनच देशातील सर्वात जास्त पुरवठा केला जातो.

बाह्य देशांतून खरेदी केले जाणार्‍या वस्तुंच्या किंमती वाढणार
तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त परिणाम हा वस्तूंच्या आयाती आणि निर्यातीवर पडला आहे. कारण यामुळे आता दुसर्‍या देशांतून खरेदी केल्या जाणार्‍या वस्तूंच्या किंमती वाढणार आहे. केडिया यांच्या मते, हे चक्रीवादळ आयात होणार्‍या उत्पादनांच्या दृष्टीने सकारात्मक आणि निर्यातीच्या दृष्टीने नकारात्मक ठरणार असल्याचे ते म्हणाले. कारण भारत देशात सध्याच तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

भारत पाम तेलाची आयात बाह्य देशांतून करत असल्यामुळे यांच्या किंमती वाढतील. तर दुसरीकडे देशात ग्वार डिंक, जिरे आणि इतर वस्तूंचे उत्पादन होत असल्याने त्यांच्या किंमती कमी होतील.

बातम्या आणखी आहेत...