आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात 'तौक्ते'चे थैमान:आंब्याच्या एक हजार हेक्टरपेक्षा जास्त बागा केल्या उध्वस्त, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज नुकसान भरपाईच्या घोषणेची शक्यता, विरोधक करत आहेत टीका

मुंबई (विनोद यादव)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निसर्गावेळी केवळ 5 रुपये प्रति झाड मदत

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये 'तौक्ते' चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. याच्या भरपाईविषयी आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकते. एक हजार हेक्टरपेक्षा जास्त आंब्याच्या बागा या उध्वस्त झाल्या आहेत. ठाकरे सरकार आज बाधित लोकांना भरपाई जाहीर करू शकते. सरकारने मदत पॅकेज जाहीर करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप करत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राणे म्हणाले की, 30 जुलै 2020 रोजी जेव्हा 'निसर्ग' चक्रीवादळाने महाराष्ट्राला धडक दिली तेव्हा कोकण आयुक्तांनी झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी 8.75 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु राज्य सरकारने काही नुकसान झालेल्या घरांना 37.19 लाख रुपये तर पिकांच्या नुकसानीसाठी 12.49 लाख रुपये दिले, एकूण 49.60 लाख रुपये दिले होते.

आमदार राणे यांनी पुढे सरकारकडे लक्ष वेधले आणि म्हणाले की, पाहा ठाकरे सरकार कोकणातील जनतेवर किती प्रेम करते. कोकणावर एवढे प्रेम कोणीच केलेले नाही. पाहून घ्या या 'तौक्ते' चक्रीवादळासाठीही ठाकरे सरकार भरपूर नुकसान भरपाई घोषित करेल.' असे उपरोधितपणे राणे बोलले आहेत.

निसर्गावेळी केवळ 5 रुपये प्रति झाड मदत
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही निशाणा साधत म्हटले की, 'ज्या बागवानांचे नारळाचे झाड निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी पडले होते. त्यांना प्रति झाडाला फक्त 5 रुपये देण्यात आले.' ते म्हणाले की 5 हजार ते 10 हजार रुपयांच्या मदतीने फळबाग पुन्हा तयार होणार नाहीत. त्यामुळे सरकारने बागांमध्ये निर्माण झालेल्या पीकांनुसार नुकसान भरपाई द्यावी.

बागांना नुकसान
सिंधुदुर्गाच्या एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले की, 'तौक्ते' चक्रीवादळाने जिल्ह्यातील बागा असणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. येथील 3,375.16 हेक्टर क्षेत्रफळाच्या बागांना चक्रीवादळाने उद्धवस्त केले आहे. येथिल 172 गावांच्या 1,059 बागा असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. एकट्या 1,110.42 हेक्टेयर क्षेत्रफळात आंब्याच्या बागांना नुकसान पोहोचले आहे. 277.61 हेक्टेयर क्षेत्रात आंबे चक्रीवादळामुळे पडले. तर 832 हेक्टर क्षेत्रात आंब्याच्या झाडांच्या फांद्या पडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी उदय सामंत यांनी सांगितले की, मासेमारांसह आंबे आणि काजूसह इतर फळांनाही चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

रायगडमध्ये मृतांची संख्या 4 वर
रायगड जिल्ह्यामध्ये तक्रीवादळ 'तौक्ते' मुळे 4 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये नीता भालचंद्र नाइक(50), सुनंदाबाई भिमनाथ घरत (55), रामा बालू कातकरी (80) आणि रमेश नारायण साबळे (46) यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरींनीही तहसीलदारांना मृत व्यक्ती, मृत प्राण्यांसह इतर नुकसानीची लवकरात लवकर पंचनामा करुन रिपोर्ट देण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...