आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरचा व्हिडिओ:तौक्ते वादळाने टगबोटला बुडवले; 13 जणांनी जीव वाचवण्यासाठी घेतल्या समुद्रात उड्या, 11 जणांचा मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दुर्घटनेतून वाचलेल्या साहेब भूनिया यांनी बोटीचा अखेरचा व्हिडिओ काढला

तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्रात बुडालेल्या वरप्रदावर नावाच्या टगबोटीवरील 13 पैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरात आणि रत्नागिरीमध्ये सापडलेल्या 16 मृतदेहांपैकी 11 वरप्रदावरील लोकांचे असल्याची माहिती आहे. जवळपास सात दिवस पाण्यात राहिल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. सध्या DNA चाचणीद्वारे त्यांची ओळख पटवली जात आहे.

समुद्रात बुडालेल्या या टगबोटचे अवशेष मुंबईपासून 35 किलोमीटर दूर समुद्रात सापडले आहेत. दरम्यान, वरप्रदा बुडतानाचा अखेरचा व्हिडिओ आता समोर आला आहे. बोटवरील 13 जणांपैकी 50 वर्षीय चीफ इंजीनियर फ्रांसिस साइमन आणि 23 वर्षीय साहेब भूनिया यांचा जीव वाचला आहे. यातील साहेब भूनियाने बोट बुडतानाचा हा व्हिडिओ शूट केलाय.

अँकर टाकले होते, वादळाने वाहून नेले

बंगालचे रहिवासी असलेल्या साहेब भूनियाने सांगितले की, हवामान विभागाच्या सूचनेनंतर आम्ही JNPT पोर्टजवळ गेलो होतो. तिथे अँकर टाकले होते. पण, वादळामुळे अँकर तुटले. काही वेळानंतर बोट बुडायला लागल्याने आम्ही समुद्रात उड्या घेतल्या. व्हिडिओत हळु-हळू बोट बुडताना दिसत आहे.

टगबोट म्हणजे काय ?
टगबोट एक मोठी बोट असून, समुद्रात खराब झालेल्या किंवा अडकलेल्या जहाजांना ओढून किनाऱ्यापर्यंत नेण्याचे काम करते.

बातम्या आणखी आहेत...