आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्ते चक्रीवादळ:विक्रोळीत काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य, झाड कोसळले आणि थोडक्यात महिला वाचली

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अनेक झाडे उन्मळून पडली. घरे, दुकाने आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि काही ठिकाणी नागरिकही जखमी झाले. विक्रोळी येथे एका महिलेच्या अंगावर झाड पडले परंतु या दुर्घटनेतुन महिलेला वाचवण्यात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

विक्रोळी पार्क साईट पोलीस स्टेशनसमोरून सूर्यनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठे झाड कोसळले. यावेळी त्या झाडाखालून काही पादचारी जात होते. यामध्ये एक महिला अगदी झाड कोसळत असताना त्याच्या खाली आली होती, परंतु मोठा आवाज झाल्याने ती धावत गेली आणि तिचे प्राण वाचले.

बातम्या आणखी आहेत...