आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या समुद्रात बुडाले जहाज:नौदलाच्या बचावकार्याचा आज चौथा दिवस, आतापर्यंत 37 मृतदेह सापडले; 38 जणांचा शोध घेत आहे 5 INS जहाज

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टोही विमान पी-81 च्या मदतीने सुरू आहे तपास अभियान

चक्रीवादळ तौक्तेमुळे समुद्रात बुडालेले जहाज (बार्ज- पी305) मध्ये असलेल्या 37 नाविकांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. गुरुवारी रात्री उशीरा 11 मृतदेह INS कोलकाताहून मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यात आले. नौदलाच्या ऑपरेशनचा आज चौथा दिवस आहे आणि बचावकार्याला 55 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. INS कोच्ची अजुनही समुद्रात बचावकार्य करत आहे. समुद्रातील लाटांच्या दरम्यान अजुनही 38 जण हे बेपत्ता आहेत. ONGC नुसार, यावर 263 लोक होते. मात्र नौदलाकडून हा आकडा पहिले 273 सांगण्यात आला होता.

विमान पी-81 च्या मदतीने सुरू आहे तपास अभियान
लाटांमध्ये बेपत्ता झालेल्या नाविकांच्या तपासासाठी नौदलाचे विमान आणि हेलिकॉप्टरने जवळपास 60 तासांपेक्षा जास्त उड्डाण घेतली आहे. नौदल आता आपल्या विमान पी-81ची मदत घेत आहे. तीन पी-81 विमान तामिळनाडू एअर बेस येथून उड्डाण घेऊन मुंबईच्या समुद्रात नाविकांचा शोध घेत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, पी -81 आकाशात राहून समुद्राच्या खोलीच्या प्रत्येक हालचाली सहजपणे शोधण्यास सक्षम आहे.

5 INS शिपला बचावकार्यात गुंतवण्यात आले
जहाज मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 88 किलोमीटर अंतरावर हीरा ऑइल फील्ड्स परिसरात बुडाले आहे. यामुळे नौदल 80 ते 100 किमी क्षेत्रावर नजर ठेवून आहे. आकाशात तपास जारी ठेवण्यासाठी 6 हेलिकॉप्टर आणि 3 विमानांची मदत घेतली जात आहे. INS कोची आणि कोलकाता व्यतिरिक्त INS वेग, INS बेतवा आणि INS व्यासही बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.

समुद्राच्या लाटांमध्ये अडकलेल्या इतर तीन जहाजांमधील लोकही सुरक्षित
यापूर्वी तीन इतर जहाज, GAL कंस्ट्रक्टरवर 137 लोक अडकलेले होते, या सर्वांना वाचवण्यात आले आहे. बार्ज SS-3 वर 202 आणि सागर भूषणवर 101 लोक अडकलेले आहेत. नौदलानुसार, हे सर्व लोक सुरक्षित आहेत आणि त्यांना जेवण-पाणी सारख्या गोष्टी पुरवल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...