आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात बचावकार्याचा पाचवा दिवस:51 मृतदेह आतापर्यंत घेतले ताब्यात, 22 जणांचा शोध सुरूच; बार्जच्या कॅप्टनसह अनेकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई (विनोद यादव)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीच्या निष्काळजीपणामुळे 50 पेक्षा जास्त लोकांनी गमावला जीव

बार्ज पी-305 बुडणे आणि त्यात असलेल्या लोकांचा जीव धोक्यात टाकल्याच्या आरोपात बार्जचे कॅप्टन राकेश बल्लव यांच्यासह इतर लोकांवर मुंबईच्या येलो गेट पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यापासून राकेश गायब आहे. असा दावा केला जात आहे की, 17 मे रोजी जेव्हा 'तौक्ते' आले तेव्हा लाइफ जॅकेट घातलेल्या राकेश बल्लब यांनी समुद्रात उडी मारली होती.

बार्जचे इंजीनियर मुस्तफीजूर रहमना शेख यांच्या तक्रारीवर धारा पोलिस स्टेशनमध्ये IPC ची कमल 304(2)(सदोष मनुष्यवध), 338 (जीव धोक्यात टाकणे) आणि कलम 34 नुसार FIR नोंदवण्यात आला आहे. रहमानचा आरोप आहे की, हवामान विभाग (IMD)च्या इशाऱ्यानंतरही राकेश बल्लवने बार्जच्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्या टाकला.

नौदल आणि तटरक्षक दलाचे बचावकार्य सलग 5 व्या दिवशीही सुरू आहे. वेस्टर्न नेवल कमांडचे प्रवक्ते कमांडर मेहुल कर्णिक यांनी सांगितले की 5 INS जहाज अद्याप समुद्रात अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे. बार्जवर काम करणारे 22 कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. शुक्रवारी पहाटेपर्यंत 51 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील 31 मृतदेह मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अन्य मृतदेह पोलिसांकडे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कंपनीच्या निष्काळजीपणामुळे 50 पेक्षा जास्त लोकांनी गमावला जीव
रेहमान यांनी असा आरोप केला आहे की बार्जवरील लोकांनी अनेक वेळा राकेश आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किनाऱ्यावरुन जाण्यास सांगितले, पण ते सर्व काही ठीक असल्याचे पुन्हा पुन्हा सांगत राहिले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, 14 ते 15 मे दरम्यान आयएमडीच्या इशाऱ्यानंतर जहाज पी 305 सुरक्षित ठिकाणी हलवले असते तर 261 लोकांचा जीव धोक्यात गेला नसता.

अभियंता रेहमान यांनाही गंभीर दुखापत झाली आहे
मुख्य अभियंता रेहमान, बार्ज बुडण्याच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत तेथे उपस्थित होते. बार्ज बुडल्यामुळे त्यांना खूप इजा झाली आहे आणि ते ताडदेवच्या अपोलो रुग्णालयात दाखल आहेत.

सलग 5 दिवशीही सुरू आहे नेव्हीचे रेस्क्यू ऑपरेशन
वेस्टर्न नेवल कमांडचे प्रवक्ते कमांडर मेहुल कर्णिक यांनी सांगितले की, अपघाताच्या दिवशी तौक्तेमुळे बचाव दलाला काही मीटर अंतरावर काहीच दिसत नव्हते. त्याचबरोबर चक्रीवादळ वारा आणि मुसळधार पावसामुळे समुद्रात वेगवेगळ्या दिशेने वाहणाऱ्या लोकांना वाचवणे खूप आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत, लाइफ जॅकेटमधील बॅटरी त्याच्यासाठी उपयुक्त ठरली, ज्याच्या प्रकाशामुळे ते नाविकांपर्यंत लवकर पोहोचू शकले. जोरदार वारे आणि उंट लाटांच्या दरम्यान नौदलाने 17 मेच्याय रात्री 60 आमि सकाळपर्यंत एकूण 188 लोकांचे जीव वाचवले होते.

बातम्या आणखी आहेत...