आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्तेमध्ये अडकलेल्या 22 लोकांच्या मृत्यूची पुष्टी:नौदलाने म्हटले - बार्ज P-305 मधून 188 लोकांना वाचवून मुंबई किनाऱ्यावर परतले INS कोची, 63 जणांचा शोध सुरू

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार दशकातील सर्वात अवघड रेस्क्यू ऑपरेशन

चक्रीवादळ तौक्ते गुजरातमध्ये जाऊन शांत झाले आहे. पण, यापूर्वी मुंबईकडून जाताना या वादळाने खूप हाहाःकार माजवला. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे समुद्रात 4 जहाज अडकले. यामधून एक जहार बार्ज P-305 आता बुडाले आहे. यामध्ये 273 लोक होते. नौदलाने सांगितले की, INS कोच्ची 188 लोकांना रेस्क्यू करुन परतले आहे. 22 जणांचे मृतदेह हाती लागले आहे तर 63 अद्याप बेपत्ता आहेत.

बार्ज P-305 व्यतिरिक्त गाल कंस्ट्रक्टर वर 137 लोक होते. या सर्वांना रेस्क्यू करण्यात आले आहे. बार्ज SS-3 वर 202 आणि सागर भूषणवर 101 लोक अडकले आहेत. नौदलानुसार, हे सर्व लोक सुरक्षित आहेत आणि यांना जेवण-पाणी सारख्या गोष्टी पुरवल्या जात आहेत. या जहाजांना ONCG मदतीने ओढून परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

समुद्रात अडकलेल्या जहाजाची स्थिती

जहाजकिती लोकं होतीकिती जणांना वाचवले
बार्ज P305273180
GAL कंस्ट्रक्टर137137
बार्ज SS-3202सर्व सुरक्षित
सागर भूषण101101

मुंबईपासून 175 किमी अंतरावर असलेल्या हीरा फील्ड्समध्ये बार्ज P305 वर सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपासून बचाव कार्य सुरू आहे. या जहाजावर सर्वाधिक 273 लोकं होती. या जहाजावरील लोकांना वाचवण्यासाठी INS कोलकाता आणि INS कोच्चीला पाठवण्यात आले आहे. डिफेंस प्रवक्ते कमांडर मेहुल कार्णिक यांनी सांगितले की, 'P305 जहाजावरुल 180 जणांना वाचवण्यात यश आले आहे. सोमवारी रात्री सात वाजता जहाज बुडाले. सध्या बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.'

चार दशकातील सर्वात अवघड रेस्क्यू ऑपरेशन
पश्चिम नौसेना पथकाचे वाइस एडमिरल एम एस पवार म्हणाले की, 'मागील चार दशकात आम्ही जितके बचाव कार्य केले, त्यातील हे सर्वात अवघड आहे.

बातम्या आणखी आहेत...