आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत अग्नितांडव:वर्सोवामध्ये गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, 4 जण जखमी; अग्निशमन दलाच्या 16 गाड्या दाखल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईतील वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली लागल्याची घटना घडली आहे

मुंबईतील वर्सोवामध्ये एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला भाषी आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असून ती लेव्हल 2 ची आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असून अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत आतापर्यत 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

वर्सोवा परिसरातील यारी रोडवर ही आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीतील जखमींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोदामाच्या बाजूलाच शाळा आणि हॉस्पिटल आहेत. खबरदारी म्हणून परिसर रिकामा करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...