आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरस मिस्त्री अपघात:अनहिता पंडोलेंवर गुन्हा; सायरस, जहांगीर पंडोलेंचा जागीच झाला होता मृत्यू

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातहून मुंबईकडे येत असताना झालेल्या कार अपघातात मागच्या सीटवर बसलेले टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री व जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन महिन्यांनंतर तेव्हा कार चालवत असलेल्या अनहिता पंडोले यांच्यावर कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनहिता आणि त्यांचे पती डेरियस अपघातात जखमी झाले होते. अपघात झाला त्या वेळी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या अनहिता पंडोले कार चालवत होत्या. पालघरच्या कासा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचंड वेगामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. अपघात झाला तेव्हा मागील सीटवर असलेले सायरस आणि जहांगीर पंडोले यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता हे पण स्पष्ट झाले होते. मर्सिडीज कारने निघालेले मिस्त्री व पंडोले कुटुंबीय अपघात झाला तेव्हा कार ताशी १२० किमी वेगाने धावत होती. पालघरमधील चारोटी चेकपोस्ट पार केल्यानंतर कारने अवघ्या ९ मिनिटांत २० किमी अंतर कापले होते.

बातम्या आणखी आहेत...