आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Cyrus Mistry Car Accident Reasons । Mercedes Benz Report । Car Was Running At 100 Kmph On The Highway, Brakes Were Applied 5 Seconds Before The Accident

सायरस यांची मर्सिडीझ 89 किमी वेगाने धडकली:महामार्गावर 100 किमी वेगाने धावत होती, अपघाताच्या 5 सेकंद आधी लावले होते ब्रेक

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद-मुंबई महामार्गावर (NH-98) रविवारी सायरस मिस्त्री यांची कार दुभाजकाला धडकून अपघात होण्यापूर्वी 100 किमी प्रतितास वेगाने धावत होती. सायरस यांच्या कारची तपासणी केल्यानंतर मर्सिडीझ कंपनीने ही माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, डॉक्टर अनायता पंडोले यांनी कार धडकण्यापूर्वी 5 सेकंद आधी ब्रेक लावला होता, ज्यामुळे कारचा वेग 89 किमी वर आला.

कारच्या तपशीलवार तपासणीसाठी, मर्सिडीजची एक तज्ज्ञ टीम हाँगकाँगहून येईल, जी 12 सप्टेंबर रोजी आपला अहवाल सादर करेल. याआधी, आयआयटी खरगपूरच्या फॉरेन्सिक टीमने या अपघातासाठी महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलाच्या खराब डिझाइनला जबाबदार धरले होते. त्याचवेळी, प्राथमिक तपासात पोलिसांनी ओव्हर स्पीडिंग आणि ओव्हरटेकिंगदरम्यान झालेली चूक ही धडकेला कारणीभूत असल्याचे म्हटले होते.

रविवार ते शुक्रवारपर्यंत, म्हणजे एकूण 15 दिवसांत अपघाताच्या कारणाबाबत तीन सिद्धांत समोर आले आहेत. कार अपघाताची कारणे खालील ग्राफिकद्वारे समजू शकतात...

पुढील बातमी वाचण्यापूर्वी अपघाताविषयी जाणून घ्या

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी अहमदाबाद-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांची मर्सिडीझ जीएलसी 220 कार महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकाला धडकली. ते गुजरातमधील उदवाडा पारसी मंदिरातून परतत होते. या अपघातात मिस्त्री (54) आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले (49) यांना जीव गमवावा लागला, तर कार चालवत असलेल्या डॉ. अनायता पंडोले आणि त्यांचे पती दरियास पंडोले जखमी झाले.

अपघातानंतर सायरस मिस्त्री (लाल वर्तुळात डावीकडे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालवत असलेल्या डॉ. अनाहिता मांडोळे (उजवीकडे) जखमी झाल्या.
अपघातानंतर सायरस मिस्त्री (लाल वर्तुळात डावीकडे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालवत असलेल्या डॉ. अनाहिता मांडोळे (उजवीकडे) जखमी झाल्या.

अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील वेग मर्यादा 90 KMPH

NH-98 वरील गाड्यांची वेगमर्यादा 90 किमी आहे, तर सूर्या नदीवरील पुलाच्या आधी वेगमर्यादा 40 किमी इतकी आहे. सायरस यांच्या कारने वेगाचे उल्लंघन आणि त्यावर कारवाई करण्याच्या प्रश्नावर पालघरच्या एसपींनी सविस्तर अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे सांगितले आहे.

मर्सिडीझने 20 किमीचे अंतर 9 मिनिटांत कापले

सायरस मिस्त्री ज्या आलिशान कारमध्ये होते त्याचे शेवटचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहे. MH-47-AB-6705 क्रमांकाची मर्सिडीझ कारने रविवारी दुपारी 2.21 वाजता चारौती चेकपोस्ट ओलांडली होती. येथून 20 किमी अंतरावर सूर्या नदीच्या पुलावर दुपारी 2.30 वाजता कारचा अपघात झाला. मर्सिडीझ कारने अवघ्या 9 मिनिटांत हे 20 किलोमीटरचे अंतर कापले.

सायरस यांची कार रविवारी दुपारी २.२१ वाजता चारौती चेकपोस्टवरून २० किमी अंतरावर सूर्या नदीच्या पुलावर आली.
सायरस यांची कार रविवारी दुपारी २.२१ वाजता चारौती चेकपोस्टवरून २० किमी अंतरावर सूर्या नदीच्या पुलावर आली.

एका प्रत्यक्षदर्शीनेही सांगितले की, कारचा वेग खूप होता. एक महिला ती चालवत होती. सूर्या नदीच्या पुलावर ओव्हरटेक करताना कार दुभाजकावर आदळली. स्थानिक लोकांनी आधी कारमधून लोकांना बाहेर काढले.

फॉरेन्सिक टीमचा अहवाल - पुलाच्या डिझाइनमध्ये त्रुटी होती

या अपघाताची चौकशी करण्यासाठी दाखल झालेल्या IIT खरगपूरच्या 7 सदस्यीय फॉरेन्सिक टीमने कारचा तपशील तपासल्यानंतर सांगितले की, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलाचे सदोष डिझाईन हे कार अपघाताचे कारण आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा यात बळी गेला.

अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीझ कार या रोड डिव्हायडरला (लाल वर्तुळात) आदळली.
अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीझ कार या रोड डिव्हायडरला (लाल वर्तुळात) आदळली.

फॉरेन्सिक टीमच्या अहवालानुसार, मिस्त्री यांच्या पोस्टमॉर्टमच्या वेळी कारची स्थिती आणि अंतर्गत जखमांवरून कार सुसाट वेगाने जात असल्याचे दिसून येते. टीम सदस्यांनी सांगितले की आमच्याकडे एक ठोस अहवाल आहे की, मागच्या सीटवर बसलेल्या दोन्ही लोकांनी (सायरस आणि जहांगीर) सीट बेल्ट बांधलेला नव्हता.

मर्सिडीझ डेटा चिप डीकोडिंगसाठी जर्मनीला पाठवली

पोलिसांचे म्हणणे आहे की मर्सिडीझने योग्य चाचणी केल्यानंतरच आपली सर्व वाहने प्लांटमधून बाहेर काढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कंपनीला विचारण्यात आले आहे की, निर्मात्याने केलेल्या चाचणी आणि तपासणीमध्ये टक्कर परिणामाचा अहवाल काय आहे... आणि कारमध्ये काही यांत्रिक दोष होता का? हे प्रश्नदेखील पोलिसांनी उपस्थित केले आहेत कारण मर्सिडीझच्या GLC 220 ला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

कारचा अपघात होताच पोलिसांनी मर्सिडीझ कंपनीला अपघाताची माहिती दिली होती. यानंतर कंपनीने पालघर पोलिसांना सांगितले की, कारमध्ये बसवण्यात आलेली डेटा रेकॉर्डर चिप डिकोडिंगसाठी जर्मनीला पाठवली जाईल. त्याचे डिकोडिंग केल्यास एसयूव्हीची संपूर्ण माहिती मिळेल.

महामार्गाचे ऑडिट होणार, 2013 मध्ये 9 ब्लॅक स्पॉट आढळले

पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले की, महामार्ग मंत्रालयाच्या टीमसह जिल्हा प्रशासनाची टीम 14 सप्टेंबर रोजी NH-98 चे ऑडिट करणार आहे. यामुळे महामार्गाच्या रचनेतील तांत्रिक दोष शोधणे शक्य होईल. 2013 मध्ये या महामार्गावर 9 ब्लॅक स्पॉट्स म्हणजेच अपघात प्रवण क्षेत्र आढळून आले. आता या महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर फलक लावण्याचीही तयारी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...