आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:दहीहंडीचा काला नेत्यांनी मटकावला, आम्ही 50 थर लावले : शिंदे; त्यांनी 50 खोके घेतले : आदित्‍य

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांनंतर मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकीय दहीहंड्यांची संख्या अधिक होती. सत्तांतरानंतर शिंदे गट, भाजप आणि आणि शिवसेना यांच्यात दहीहंडीच्या निमित्ताने राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली.

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी, कष्टकऱ्यांप्रमाणेच हे सरकार गोविंदांचेही आहे. दीड महिन्यापूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली. 50 थर लावले होते. ती हंडी कठीण होती, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती फोडलीच, अशी राजकीय फटकेबाजी करत टेंभी नाक्याच्या मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोले लगावले.

तर, दुसरीकडे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर चांगलेच तोंडसुख घेतले. आदित्य म्हणाले, त्यांनी 50 थर लावले नाहीत तर 50 खोके मिळवले आहेत. भाजपला मुंबई म्हणजेच मलई दिसत असल्याचा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर शरसंधान करत मुंबई पालिका भ्रष्टाचारमुक्त करू, असे सांगत आपली आगामी भूमिका स्पष्ट केली.

बातम्या आणखी आहेत...