आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्काळजीपणा भोवला:डंपर चालकाने नऊ वर्षांच्या मुलीला चिरडले, दहिसरमध्ये तणाव, नागरिकांमध्ये प्रचंड रोष

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहिसर (पूर्व), रावळपाडा परिसरात गुरुवारी दुपारी विद्या संतोष बनसोडे (वय 9) या मुलीला डंपर चालकाने आधी धडक दिली आणि नंतर टायरखाली चिरडले. या घटनेनंतर रावळपाडा (दहिसर) येथील परिस्थिती तणावपूर्ण असून नागरिकांमध्ये स्थानिक पोलिस, वाहतूक विभाग आणि डंपर चालकांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

डंपर चालकांच्या निष्काळजीपणामुळे रावळपाडा परिसरात गेल्या दोन वर्षांत सुमारे तीन-चार मुलांचा चिरडून मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

शिवसेनेचा (शिंदे गट) शाखा क्रमांक- 4 चे उपशाखाप्रमुख अरफान फिदई यांनी एस.ए न. दुबे रोडवर डंपरसह अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असतानाही येथून वाहनांची वाहतूक सुरू असते, असा गंभीर आरोप केला आहे. मार्च महिन्यातच त्यांनी दहिसर पोलिस ठाण्यात डंपर चालकांच्या बेशिस्तपणे वाहन चालविण्याबाबत तक्रार केली होती.

अरफान फिदई सांगतात की, याआधी डंपरने चिरडून एका महिलेचा आणि एका पुरुषाचा वेदनादायक मृत्यू झाला होता, असे असतानाही स्थानिक वाहतूक विभाग आणि दहिसर पोलिसांच्या संगनमताने रावळपाड्यातील एस. दुबे परिसरात डंपर सुरू आहेत. स्थानिक आमदार-खासदारही त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत नसल्याचे रावळपाडा परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत.