आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाची भीती:शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार काही दिवस बंद, एका जेष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील

शिवसेना भवनात नियमित येणाऱ्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. यामुळेच शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाची लागण झालेला शिवसैनिक पक्षाच्या एका खासदाराचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत आहे. 

कोरोनाची लागण झालेल्या शिवसैनिकाचा नियमित शिवसेना भवनमध्ये वावर असतो. शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर सोमवारीपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद राहतील. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.

दरम्यान नुकताच शिवसेना भवनमध्ये पक्षाचा 54 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती आहे. आता एका जेष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता तर थेट शिवसेना भवनमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने आतमध्य़े काम करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. 

बातम्या आणखी आहेत...