आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘सेव्ह बर्ड’ मोहिमेसाठी दैनिक भास्करला मिळाला प्रतिष्ठित ऑलिव्ह क्राऊन अवॉर्ड

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक भास्करला ‘सेव्ह बर्ड’ मोहिमेसाठी प्रतिष्ठित ऑलिव्ह क्राऊन अवॉर्डने सन्मानित केले. या माध्यमातून देशभरातील लोकांना पक्ष्यांसाठी अापल्या अंगणात, बाल्कनी आणि खिडक्यांसह मोकळ्या जागी दाणे आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जागरूक केले जाते. यामुळे तळपत्या उन्हात भूक, तहानेने व्याकूळ पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात.

मुंबईच्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये आयोजित समारंभात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दैनिक भास्करची प्रवेशिका प्रेस कॉर्पाेरेट श्रेणीअंतर्गत नामांकित केली होती. या अनोख्या मोहिमेसाठी भास्करला रौप्य पुरस्कार दिला. ही जाहिरात अपोस्ट्रॉफी एफने(अतुल ग्रुप) डिझाइन केली होती. या प्रभावी मोहिमेद्वारे हे सांगितले होते की, उन्हाळ्यात ज्या बाबी माणसांसाठी सोयीस्कर आहेत, त्या या मुक्या पक्ष्यांना उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या पुरस्काराचे आयोजन इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंंग असोसिएशनने(आयएए) केले होते.