आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार
आज मंगळवार 3 जानेवारी असून, पौष महिन्यातील शुक पक्षातील द्वादशी तिथी
पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी....
केंद्राचा नोटबंदीचा निर्णय वैध- सुप्रीम कोर्ट
केंद्र सरकारचा नोटबंदीचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्यच होता. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने सोमवारी 4-1 मत फरकाने हा निकाल दिला. तसेच सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याने हा निर्णय वैध ठरतो. नोटबंदीचा उद्देश काळा पैसा, दहशतवादी कारवायांसाठीचा पैसा रोखण्यासाठी होता असेही निकालात नमूद करण्यात आलंय. 8 नोव्हेंबर 2016 रोजी केलेल्या नोटबंदीविरोधात विविध 58 याचिका दाखल झाल्या होत्या. वाचा सविस्तर
राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका
उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडलीये. राजस्थान आणि गुजरातमार्गे थंड वारे येत असल्याने महाराष्ट्रातही चांगलाच गारठा वाढला आहे. राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानविभागाकडून वर्तवण्यात आलाय. राज्यात सोमवारी नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे नीचांकी 7.1 तापमानाची नोंद करण्यात आली. यासह देशातील यूपी, हरियाणा व राजस्थानसह 4 राज्यांत थंडीची लाट पसरलीय आहे. वाचा सविस्तर
भाजपकडून लोकसभेची तयारी सुरू
आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यांचा कार्यक्रम आखला आहे. तसेच या दोन्ही नेत्यांच्या वर्षभरात 24 जाहीर सभाही होणार आहेत. याशिवाय भाजपने “लाेकसभा प्रवास’ हे अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत गृहमंत्री अमित शहा 11 राज्यांचा दाैरा करणार आहेत. त्यांचा हा दाैरा 5 जानेवारीपासून त्रिपुरातून सुरू हाेईल. वाचा सविस्तर
भारत-श्रीलंका आजपासून टी-20 मालिका
भारतीय संघ नव्या वर्षात आजपासून घरच्या मैदानावर मालिका विजयासाठी उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात हाेत आहे. मुंबईतील वानखेेडे स्टेडियमवर हे दाेन्ही संघ सलामीच्या सामन्यात समाेरासमाेर असतील. दुखापतीमुळे भारताच्या नियमित कर्णधार राेहित शर्माला विश्रांती देण्यात आली. हार्दिक पंड्यावर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणारे. वाचा सविस्तर
31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची सुरुवात लोकसभेतील सेंट्रल हॉलमध्ये आणि राज्यसभेतील संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत आर्थिक सर्वेक्षण अहवाल जारी केला जाईल. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभरात कशावर आपली नजर असणार ते...
काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा यूपीतील गाझियाबादमध्ये प्रवेश
((भारत जोडोचा यूपीतील गाझियाबादमध्ये प्रवेश))
विरोधीपक्ष नेते अजित पवारांच्या विरोधात भाजप आक्रमक, अनेक ठिकाणी आंदोलने
((अजित पवारांच्या विरोधात भाजपचे अनेक ठिकाणी आंदोलन))
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.