आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्निंग न्यूज ब्रीफमहावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून राज्यात संपाची हाक:दिल्लीतील तरुणीचा मृत्यू जखमांमुळे, अत्याचारामुळे नाही; टीम इंडियाने जिंकला वर्षातील पहिला T20

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • Url: Divya Marathi Morning News Bulletin And Latest Headlines Google Title; Divya Marathi Morning News Bulletin And Latest Headlines; Sakalchya Batmya | Morning News Brief

नमस्कार

आज बुधवार 4 जानेवारी असून, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी

पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी....

टीम इंडियाने जिंकला वर्षातील पहिला T 20

टीम इंडियाने 2023 मधील पहिला सामना जिंकत श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव केला. शिवम मावीने पदार्पणाचा सामना खेळत 4 विकेट घेतल्या. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाने 5 वर्षांनंतर वर्षातील पहिला सामना जिंकला आहे. वाचा सविस्तर वृत्त

जगभरात, देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

जगभरात चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. चीन आणि ब्रिटनमध्ये हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. युक्रेनमध्ये दर आठवड्याला कोरोनामुळे 50 ते 70 मृत्यू होत आहेत. तर अमेरिकेतही परिस्थिती बिकट आहे. दरम्यान भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. देशात XBB 1.5 व्हेरियंटसह 5 रुग्ण आढळलेत. तसेच गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण आढळले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर वृत्त

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलाय. वाचा सविस्तर वृत्त

दिल्लीत मृत तरुणीचा उत्तरीय अहवाल

दिल्लीच्या कंझावला भागातील तरुणीचा मृत्यू रस्ते दुर्घटनेतील गंभीर जखमांमुळे झाला आहे. स्कूटरस्वार तरूणीला कारने सुमारे 12 किलोमीटर फरफटत नेले होते. सुरूवातीच्या उत्तरीय तपासणी अहवालात तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जखमांच्या खुणा लक्षात घेऊन अनेक किलोमीटर तिला फरफटत नेल्याचे स्पष्ट होते असेही सांगण्यात आलंय. दरम्यान, मंगळवारी तरूणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. केजरीवाल सरकारकडून तरुणीचं कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही करण्यात आलीये. वाचा सविस्तर वृत्त

अमित शहा जानेवारीत 11 राज्यांचा करणार दौरा

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जानेवारीमध्ये 'लोकसभा प्रवास'या अभियानाअंतर्गत 11 राज्यांचा दौरा करणार आहेत. त्रिपुरातून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर नागालँड, मणिपूर, छत्तीसगड झारखंडला, आंध्र प्रदेश असा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या यादीत उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचाही समावेश असणारे. वाचा सविस्तर वृत्त

आजपासून राष्ट्रवादीची जनजागर यात्रा, शरद पवारांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

बातम्या आणखी आहेत...