आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस:दलित, ओबीसी नेत्यास प्रदेशाध्यक्षपद; नितीन राऊत, नाना पटोले, राजीव सातव यांची नावे आघाडीवर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलासाठी खलबतांना वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार हे आता जवळपास निश्चित असून दलित किंवा ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले जाईल. ऊर्जामंत्री नितीन राऊत, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व खासदार राजीव सातव यांची नावे यात आघाडीवर आहेत.

प्रदेशाध्यक्षपदासाठी ३ नावे सुचवा, असे आवाहन प्रदेश काँग्रेस प्रतिनिधींना करण्यात येत आहे. प्रभारी एच. के. पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे. काँग्रेसच्या शक्ती ॲपद्वारे हे डिजिटल मतदान घेतले जात आहे.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वत:च राजीनाम्याची तयारी दाखवल्यानंतर पाटील दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण या तीन बड्या काँग्रेस नेत्यांशी त्यांनी याबाबत चर्चा केली. काँग्रेसचे आधीचे दोन्ही प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातील आहेत. त्यामुळे काँग्रेसने हा विचार सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...