आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटकोपरच्या पूर्व उपनगरात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या डान्सबारवर पाेलिसांनी गुरुवारी रात्री छापा मारून २३ जणांना अटक केली आहे. या डान्सबारमधून १३ बारबालांची सुटका सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
घाटकाेपरमधीत पंतनगरात डान्सबार सुरू असल्याची माहिती खबऱ्याने दिल्यानंतर पाेलिसांच्या समाजसेवा पथकाने गुरुवारी रात्री सव्वाअकरा वाजता छापा मारला. या ठिकाणाी अनेक महिला अनधिकृतपणे नृत्य करताना व ग्राहकांना सेवा देताना आढळून आल्या. पाेलिसांनी १३ महिलांची मुक्तता करत २३ जणांना ताब्यात घेतले आहे. यात बारच्या व्यवस्थापक, कॅशिअर आणि सात वेटर आणि १३ ग्राहकांचा समावेश आहे. याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा नोंदवला असून या छाप्यादरम्यान ३५,७६० रुपये रोख आणि संगणक, उपकरणे जप्त केली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.