आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना रनोटने ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दार:महाराष्ट्रात आपल्या जिवाला धोका, राज्यातील सर्व न्यायालयीन खटले सिमल्याला हलवा : कंगना

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी आंदोलकांवर टिप्पणी : कंगनाविरुद्ध सुनावणी थांबवण्यास कर्नाटक कोर्टाचा नकार

कंगना रनोट व तिची बहीण रंगोली चंदेलने सुप्रीम कोर्टातही एक याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी आपल्याविरुद्धचे सर्व कोर्ट खटले सिमल्यातील कोर्टात स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात आपल्या जिवाला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याचिकेत कंगनाने म्हटले आहे की, राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार आपल्याविरुद्ध सूडबुद्धीने काम करत आहे. केंद्राने तिला वाय श्रेणीतील सुरक्षा दिली आहे.

शेतकरी आंदोलकांवर टिप्पणी : कंगनाविरुद्ध सुनावणी थांबवण्यास कर्नाटक कोर्टाचा नकार
बंगळुरू - अभिनेत्री कंगना रनोटविरुद्ध कनिष्ठ कोर्टात सुरू असलेल्या खटल्याची कार्यवाही रोखण्यास कर्नाटक हायकोर्टाने नकार दिला आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलकांवरील कंगनाच्या शेरेबाजीबाबत हा खटला सुरू आहे.

हायकोर्टाचे न्यायमूर्ती एच.पी. संदेश यांनी कंगनाला एका आठवड्याची मुदत दिली आहे. कोर्ट म्हणाले, तिने प्रकरणातील आधीच्या आक्षेपांचे निराकरण करावे. यानंतर तिच्या मागण्यांवर कोर्ट विचार करेल. कोर्टाची सुनावणी १८ मार्चपर्यंत लांबणीवर टाकली. कंगनाविरुद्ध तुमकुरच्या प्रथम श्रेणी मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात वकील रमेश नाईक एल. यांनी याचिका दाखल केलेली आहे. कंगना रनौतविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टाने पोलिसांना आदेश देण्याची मागणी त्यात केलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...