आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकहट्ट नडला...:मुंबईत ‘धोकादायक’ इमारत कोसळून 19 रहिवासी ठार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • २०१३ पासून पालिकेने वारंवार नोटीस बजावली, रहिवाशांनी चार मजली इमारत सोडणे दूरच, साधी डागडुजीही केली नाही!

कुर्ला येथे सोमवारी मध्यरात्री चार मजली इमारत कोसळून एका महिलेसह १९ रहिवासी ठार झाले. १४ जण जखमी असून त्यापैकी १० जणांना उपचार करून सोडण्यात आले. मृतांमध्ये बहुतांश भाडेकरू मजुरांचा समावेश आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती आहे. अग्निशमन दल व एनडीआरएफ पथकाचे बचावकार्य मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या, २ रेस्क्यू व्हॅन, जवान, अधिकारी, २८ कामगार, ५ जेसीबी, १ लॉरी बचावकार्यात आहेत. सन १९७३ मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीला सन २०१३ मध्ये प्रथम महापालिकेने दुरुस्तीची नोटीस बजावली होती. २०१५ मध्ये धोकादायक इमारतींच्या यादीत टाकून पाडण्याची नोटीस देण्यात आली. मे. सचदेव आणि असोसिएट्स यांच्याद्वारे करण्यात इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर इमारत “सी २ बी’ या प्रवर्गात समाविष्ट केली. त्यात इमारत दुरुस्ती सांगण्यात आली, तरीही दुरुस्ती झालीच नाही, असे अतिरिक्त मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

ठाकरे सरकारची ५ लाखांची मदत, मोफत उपचारही
मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आई-मुलगा सुदैवाने बचावले
दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये १६ सदनिका होत्या. ठक्करबाबा कॉलनीतील इमारत धोकादायक होती म्हणून बलिया कुटुंब दोन दिवसांपूर्वी नाईक नगरच्या या इमारतीत राहायला आले होते. पत्नी देवकी आणि मुलगा प्रीत यास ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले. मात्र रमेश बलिया दगावले.

बंडखोर शिंदे गटाकडूनही पाच लाखांची मदत जाहीर
मंत्रिपदावरुन हकालपट्टी झालेले एकनाथ शिंदे आणि स्थानिक बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्याकडून मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.