आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:परप्रांतीयांबाबत भूमिका बदलली तरच मनसेशी युती करु, शिवसेनेने भाजपसोबत दगाफटका केला - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे​​​​​​​

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही शविसेना-भाजप युतीला मते मागितली होती. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे सांगत होते. तेव्हा शविसेनेचे नेतेही मंचावर असायचे. त्यानुसार लोकांनी आम्हाला मते दिली. पण शविसेनेने दगाफटका केला, असा आरोप करत मनसेने परप्रांतीयांबाबत भूमिका बदलली तर त्यांच्याशी युती होऊ शकते, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

दानवे यांनी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी टीका केली. या वेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरून राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. त्यांच्यातून एखाद्याला धोका झाला असेल आणि आम्हाला येऊन मिळाला असेल तर आमचा दोष काय? असे ते म्हणाले. हिंदुत्व सोडले नाही हे शविसेना सांगते. याचा अर्थ त्यांनी हिंदुत्व सोडले आहे, असेही ते म्हणाले.

मोदी-योगींनी करून दाखवले
राज ठाकरे आमच्याविरोधात बोलले तर त्यांना आनंद होत होता. मोदींवर टीका केली तर त्यांना आनंद वाटतो. आज ते आमच्या बाजूने बोलले तर त्यांच्या का पोटात दुखते, असा सवाल त्यांनी केला. पाच राज्यांपैकी चार राज्ये भाजपने जिंकली. मोदी आणि योगींनी करून दाखवले, असेही ते म्हणाले.