आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कमी गुणांमुळेच दर्शन सोलंकीची आत्महत्या

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाॅम्बे आयआटीचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या प्राध्यापकांच्या चौकशी समितीने विद्यार्थ्याने परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केली असून दर्शनच्या आत्महत्येमागे जातिआधारित भेदभावाचा कोणताही विशिष्ट पुरावा नाही, असा निष्कर्ष काढला आहे. मूळचा अहमदाबादचा असलेला पण मुंबई आयआयटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असलेल्या सोलंकीने त्याच्या सेमिस्टर परीक्षा संपल्याच्या एका दिवसानंतर १२ फेब्रुवारी रोजी चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. कॅम्पसमध्ये जातीय भेदभाव केला जात होता. या कारणामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता

बातम्या आणखी आहेत...