आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता सिंधुताई कोरोना पॉझिटिव्ह:सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता कोरोना पॉझिटिव्ह, अंत्यसंस्कारावेळी आल्या होत्या अनेकांच्या संपर्कात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत त्यांनी स्वत: फेसपुक पोस्ट करत माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ममता सिंधुताई यांनी केले आहे.

दरम्यान, सिंधुताई यांच्या अंत्यसंस्कारावेळी शहरातील अनेक राजकीय नेते, नागरिक, सामाजिक कार्यक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. आता ममता सिंधुताई यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाल्या ममता?
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन ममता यांनी केले आहे. त्यांनी फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...